शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळच बसेना

By admin | Updated: December 11, 2014 23:50 IST

आजरा ग्रामपंचायतीसमोर पेच ? : इतर मार्गांतून मिळणाऱ्या उत्पन्नातील खर्चही पाणीपुरवठा योजनेवर

ज्योतिप्रसाद सावंत -आजरा ग्रामपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेवर १ एप्रिल २०१४ ते ३० नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत प्रति महिना २ लाख ७५ हजार रुपयांच्या सरासरीने तब्बल २२ लाख ५२२० रुपये खर्च झाले असून, येत्या उर्वरित चार महिन्यांकरिता आणखी ९ ते १० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. २४ लाख रुपये उत्पन्न आणि ३२ ते ३३ लाख रुपये खर्च अशी या पाणीपुरवठा योजनेची अवस्था झाली आहे.नळपाणी पुरवठा योजनेपासून वार्षिक २२ लाख ५२२० इतके उत्पन्न मिळते. ग्रामपंचायत दप्तरी २३९२ नळपाणी कनेक्शन ग्राहकांची नोंद आहे. एकूण खर्चापैकी कायम व हंगामी नोकरांचे पगार, त्यांना इतर वेतनविषयक लाभ, बोनस यासाठी निव्वळ खर्च साडेनऊ ते दहा लाख रुपये प्रतिवर्षी खर्ची पडत आहेत. नळपाणी पुरवठा योजनेचे वीज बिल १३ ते १४ लाख रुपयांच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त टी.सी.एल. पावडर, लिकेज काढणे, मोटर खरेदी, वाढीव पाईपलाईन यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होताना दिसतो. नोकर पगार, विद्युत बिल आणि गळत्या काढणे यामुळे ग्रामपंचायतीला नळपाणी पुरवठा योजनेपासून मिळणारे उत्पन्न व खर्च याचा काहीच ताळमेळ बसेनासा झाला आहे.आगीतून फुफाट्यात प्रमाणे पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य टाकीला मोठी गळती असल्याने ही गळती काढणे व विद्यानगर येथील हिरण्यकेशी नदीशेजारील पंपहाऊसची दुरुस्ती करणे यासाठी सुमारे दहा लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च येत्या चार महिन्यांत करण्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा परिषदेकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे; पण पुढे काय आहे? त्याचे उत्तर ग्रामपंचायत प्रशासनाकडे सध्यातरी नाही. २००७-०८ साली नव्याने मंजूर झालेल्या योजनेचे ग्रामपंचायतीकडे अद्याप हस्तांतरण झालेले नाही. सद्य:स्थितीला जसे आहे तसे हस्तांतरण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामपंचायत नळपाणी पुरवठा योजनेचे पुढे काय? याचे उत्तर मिळणार नाही. या सर्व प्रकारात ग्रामपंचायतीला इतर मार्गातून मिळणाऱ्या उत्पन्नातील सुमारे दहा लाख रुपये पाणीपुरवठा योजनेवर प्रतिवर्षी खर्च करावे लागत आहेत. हा भुर्दंड ग्रामपंचायतीला अडचणीचा ठरत आहे.