शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

(सुधारित) पावसाचे पुनरागमन तरी तुरळक सरींवरच समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:27 IST

कोल्हापूर : तब्बल आठवडाभरानंतर पावसाचे तुरळक सरींनी पुनरागमन झाले आहे, पण सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता दमदार पाऊस होणार नसल्याने ...

कोल्हापूर : तब्बल आठवडाभरानंतर पावसाचे तुरळक सरींनी पुनरागमन झाले आहे, पण सध्याची हवामानाची परिस्थिती पाहता दमदार पाऊस होणार नसल्याने या महिनाअखेरपर्यंत अशाच तुरळक सरींवर समाधान मानावे लागेल असे दिसत आहे. दरम्यान, गुरुवारी सकाळपासूनच पावसाने आगमन केले आहे. दुपारी शहरात जोरदार सर आली, त्यानंतर थांबून थांबून भुरभुर राहिली, पण त्यात फारसा जोर नव्हता.

जिल्ह्यात सध्या असळका नक्षत्राचा पाऊस सुरू आहे. श्रावणसरीप्रमाणेच जिथे ढग उतरेल तिथे पाऊस पडत आहे. उन्हाचा तडाखाही वाढला आहे. गुरुवारी दुपारी अचानक पावसाच्या सरी कोसळल्या तरीही हवेत अजिबात गारवा नव्हता. जिल्हाभर कमी अधिक प्रमाणात अशीच स्थिती असून दिवसभरातून एखाद दुसरी हलकीशी सर येत आहे. यामुळे पिकांची हिरवाई कायम आहे, पण सध्या ऊन वाढू लागल्याने वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. विशेषत: भात आणि भुईमुगाला पाण्याची जास्त गरज आहे. भात पोटरीच्या, तर भुईमूग आऱ्या सुटण्याच्या, शेंगा पोसण्याच्या अवस्थेत आहे. यावेळेस पाण्याचा ताण बसला तर त्याचा फटका उत्पादनावर बसणार आहे. आधीच महापुरामुळे आणि अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. महापुरातून जे काही वाचले आहे, ते आता या पावसाच्या दडीमुळे वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आजपासून आठवडाभर तुरळक पाऊस असणार आहे, तर रविवार व सोमवारी पावसाचा जोर राहणार आहे. याचवेळी स्कायमेटने वर्तविलेल्या अंदाजानुसार आजपासून पावसाची दडी कायम राहणार असून केवळ १५ ऑगस्टला किरकोळ पाऊस पडेल. त्यानंतर २३ पासून पुन्हा पाऊस परतेल तो २६ ऑगस्टपर्यंत कायम राहील, असा पूर्वअंदाज वर्तविला आहे.

चौकट

सोमवारपासून सासूचा पाऊस

सोमवारी मघा नक्षत्र अर्थात सासूचा पाऊस सुरू होत आहे. वाहन गाढव असले तरी पारंपरिक अंदाजानुसार पर्जन्यमान कमीच राहणार आहे. त्यामुळे मघा, ढगाकडे बघा या पारंपरिक म्हणीची प्रचिती येण्याची चिन्हे आहेत.

चौकट

दिवसभरात अवघा ३मि.मी. पाऊस

गुरुवारी दुपारपर्यंत जिल्ह्यात सरासरी अवघा तीन मि.मी. पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक ४. ९ मि.मी. पाऊस आजरा तालुक्यात झाला आहे. चंदगडमध्ये ४.१, शाहूवाडीत ३.५, भुदरगडला ३.३, गगनबावड्यात २.८, तर उर्वरित तालुक्यात १ ते २ मि.मी. पाऊस गेल्या चोवीस तासांत नोंदवला गेला आहे.