शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सुधारित : मूल्यमापनाला शिक्षक घाबरतात का..? विद्यार्थी-पालकांचे मत : ‘डाएट’कडून मुल्यमापन नाही, निव्वळ प्रशिक्षणच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून (डाएट) शिक्षकांना निव्वळ प्रशिक्षण दिले जाते. मात्र, त्यांचे प्रत्यक्षात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेकडून (डाएट) शिक्षकांना निव्वळ प्रशिक्षण दिले जाते. मात्र, त्यांचे प्रत्यक्षात मूल्यमापन केले जात नाही. प्राथमिक, माध्यमिक शिक्षक हे त्यांच्या अध्यापनात गुणवत्ता असल्याचे सांगतात. मग, शासन कसेही मूल्यमापन करू दे शिक्षकांना घाबरण्याची गरज काय? देशातील विविध यंत्रणा, विभागाचे मूल्यमापन, ऑडिट होते. त्यामुळे शिक्षकांनी मूल्यमापनाला सामोरे जावे. मात्र, शासनाने हे मूल्यमापन शिक्षणक्षेत्रातील अनुभवी संस्थेच्या माध्यमातून करावे, असे मत कोल्हापुरातील विद्यार्थी, पालक संघटनांनी सोमवारी व्यक्त केले.

‘डाएट’कडून अध्ययन स्तर निश्चितीचे काम केले जाते. शाळाभेटी, पर्यवेक्षण आणि चार टप्प्यांमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण मूल्यमापन केले जाते. शाळाभेटीनंतर शिक्षकांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या अध्यापनाबाबत काही सूचना केल्या जातात. नवीन शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाते. निवडश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षकांचे प्रत्यक्षात मूल्यमापन होत नाही. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांचे प्रत्यक्षात मूल्यमापन करण्याची यंत्रणाच नाही. त्यामुळे ‘डाएट’चे नाव पुढे करून शिक्षक त्यामागे लपत असल्याचेही चित्र समोर आले आहे. राज्य सरकारने बाह्य संस्थेकडून मूल्यमापन करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जरुर निधी खर्च होणार आहे. त्या निधीची व खर्चाची काळजी शिक्षक का करत आहेत, अशीही विचारणा शिक्षण क्षेत्रातून होत आहे. विद्यार्थ्यांचे चांगले मूल्यांकन होत असेल तर असा खर्च सरकारने जरुर करावा व खरेच आपले शिक्षण कितपत गुणवत्तापूर्ण आहे, याचा शोध घेतला जावा, अशी सार्वत्रिक भावना आहे. राज्य सरकारने कोणताहा निर्णय घेतला की त्याला सर्वाधिक विरोध करणारा घटक अशीच काहीशी शिक्षकांची प्रतिमा होत आहे.

प्रतिक्रिया

अध्ययन स्तर निश्चितीसह चार टप्प्यांमध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यमापन डाएट करते. गरजाआधारित, अध्यापनातील नवीन प्रवाहाबाबत आणि वेतनश्रेणीसाठीचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येते.

- आय. सी. शेख,

प्राचार्य, डाएट, कोल्हापूर.

विद्यार्थी, पालक संघटनांचे पदाधिकारी काय म्हणतात?

देशातील आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, आदी यंत्रणांचे मूल्यमापन, ऑडिट केले जाते. मग, शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन होण्यास काय हरकत आहे. शिक्षकांनी स्वत:हून आमचे मूल्यमापन करावे, असे शासनाला सांगावे. शासनाने शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापनासाठी शिक्षण क्षेत्रातील उच्च अनुभव असलेल्या संस्थेची नियुक्ती करावी.

- रमेश मोरे,

समन्वयक, शिक्षण वाचवा नागरी कृती समिती.

शिक्षकांच्या कामाचे बाह्य आणि अंतर्गत मूल्यमापन व्हावे. त्यातून त्यांची गुणवत्ता समजण्यास मदत होणार आहे. या मूल्यमापनातून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काही नवीन उपक्रम राबविण्याची पावले शासनाला टाकता येतील.

- ऋतुराज माने,

मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समिती.

नवी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांच्या माध्यमातून होते. त्यांना वेतनही चांगले आहे. त्यांच्या कामाचे मूल्यमापन झाले पाहिजे. त्यांनी शिकवलेले विद्यार्थ्यांना कळते का नाही, हे शासनाला समजणे आवश्यक आहे.

- फिरोज सरगूर,

सचिव, विद्यार्थी-पालक प्रवेश हक्क संरक्षण संघटना.

चौकट

नव्या धोरणात ‘डाएट’कडून प्रमाणिकरण

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या अध्यापनाच्या प्रमाणिकरणाची जबाबदारी ‘डाएट’ या संस्थेवर असणार आहे. या संस्थेकडून ही जबाबदारी पार पाडली जाणार आहेे.