डाॅ. माने म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आपल्या जाहीरनाम्यात मुस्लिम समाजाला शैक्षणिक पाच टक्के आरक्षण लागू करण्याचे जाहीर केले होते. सत्तेवर आल्यानंतरही त्यास तत्त्वत: मान्यताही दिली होती; परंतु त्याची अंमलबजावणी अद्यापही शासनाने केलेली नाही. त्यामुळे सत्तेवर येताना दिलेले आश्वासन शासनाने पाळावे. समाज घटकांना आरक्षणाचा लाभ मिळण्यासाठी शिक्षण आणि नोकरीमध्ये भागीदारी मिळावी या उद्देशानेच या परिषदेचे आयोजन केले आहे. कोणत्याही समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण मिळत नसून, ते मागासलेपणावर मिळते. मुस्लिम समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे. हे आरक्षण लागू केले तर त्याचा लाभ समाजाला होईल.
यावेळी जमियते उलेमा ए. हिंदचे अध्यक्ष मौलाना इरफानसाब खान (कासमी), हिलाल कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूरसाब सय्यद, बडी मस्जीदचे खतिब व इमाम मौलाना अब्दुस्सलाम कासमी, मौलाना रईससाब खान, डाॅ. रसूल गफूर कोरबू, डाॅ. एम. सी. शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.
फोटो : ०९०१२०२१-कोल-मुस्लिम आरक्षण
ओळी : कोल्हापूरातील राजर्षी शाहू स्मारक भवनात शनिवारी आयोजित केलेल्या मुस्लिम आरक्षण परिषेदेत बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे अध्यक्ष ॲड. डाॅ. सुरेश माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डावीकडून जाफरबाबा सय्यद, मौलाना इरफान खान कासमी, डाॅ. एम. सी. शेख, आदी मान्यवर उपस्थित होते.
(छाया : आदित्य वेल्हाळ)