शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

सुविधा हव्यात, तर हद्दवाढीला पाठिंबा द्या

By admin | Updated: August 22, 2016 00:55 IST

ग्रामीण जनतेला आवाहन : आज दसरा चौकात धरणे आंदोलन

कोल्हापूर : शहराप्रमाणे सुविधांचे जाळे ग्रामीण भागातही पसरण्यासाठी ग्रामीण जनतेने गैरसमज दूर करून कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा; तसेच लोकप्रतिनिधींनी मताचे राजकारण बाजूला ठेवून भविष्यातील विकासगंगा रोखू नये, असे आवाहन सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने घेतलेल्या जनजागृती मेळाव्यात केले. ३१ आॅगस्टपर्यंत हद्दवाढीबाबत राज्य शासनाने अधिसूचना न काढल्यास सर्व पदाधिकारी नगरसेवकांसह आमरण उपोषणात सहभागी होणार असल्याचा इशारा मेळाव्याच्या अध्यक्षा महापौर अश्विनी रामाणे यांनी दिला. हद्दवाढीसाठी येथील मध्यवर्ती बसस्थानक चौकात सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने जनजागृती मेळावा झाला. हद्दवाढीच्या सकारात्मक भूमिकेबाबत मुख्यमंत्री, पालकमंत्री यांचे अभिनंदन केले. अधिसूचना तातडीने काढावी, यासाठी आज, सोमवारी दसरा चौकात होणाऱ्या धरणे आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात केले. यावेळी नामदेवराव गावडे, अनिल चव्हाण यांनी भाषण केले, तर प्रदीप कवाळे यांनी आभार मानले. महिला व बालकल्याण समिती सभापती वृषाली कदम, बाबा पार्टे, नगरसेवक सुभाष बुचडे, बी. एल. बर्गे, आदी उपस्थित होते. १५ हजार जण धरणे आंदोलनात सहभागी होणार दसरा चौकातील धरणे आंदोलनात विविध क्षेत्रांतील सुमारे १५ हजार नागरिक सहभागी होऊन हद्दवाढीबाबत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर प्रतिज्ञा करणार आहेत. बुधवार (दि. २४) पर्यंत हद्दवाढीबाबत अधिसूचना न काढल्यास सुमारे १० पक्षांचे ३५ हून अधिक कार्यकर्ते आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निमंत्रक आर. के. पोवार यांनी दिला. गद्दार आमदारांच्या घरांसमोर बोंब मारू शहरात राहून हद्दवाढीबाबत गद्दारी करणाऱ्या आमदारांच्या घरांसमोर बोंब मारो आंदोलन करावे. हेच ग्रामीण जनतेच्या मनात गैरसमज पसरवून दिशाभूल करून विकासासाठी खीळ घालत आहेत, असाही टोला सतीशचंद्र कांबळे यांनी लगावला. ग्रामीण लोकप्रतिनिधींवर टीका आम्ही ग्रामीणच्या जमिनी घेणार नाही, अवास्तव कर लादणार नाही, असे आवाहन भाजपचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांनी करत गैरसमज दूर करण्यासाठी एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान हद्दवाढविरोधी नेते स्वीकारत नसल्याची टीका केली. विकासाचा विस्तार वाढवा शहराप्रमाणे परिसरातील गावांत मोठमोठे रस्ते, दवाखाने, महाविद्यालये, आयटी हब, आदी विकासाची गंगा येण्यासाठी ग्रामीण जनतेने गैरसमज दूर करून हद्दवाढीसाठी समर्थन द्यावे. लोकप्रतिनिधींनी भविष्यातील विकासाच्या विस्तारीकरणात अडथळा आणू नये, असेही आवाहन राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी केले. माजी नगरसेवकांचा पाठिंबा शहराच्या हद्दवाढीसाठी माजी नगरसेवक संघटनेने पाठिंबा दिला. हद्दवाढीचा लढा अंतिम टप्प्यात असून, आज दसरा चौकात होणाऱ्या धरणे आंदोनलात माजी महापौर, माजी सभापतींसह माजी नगरसेवकांनी सहभागी होण्याचेही आवाहन संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम यांनी केले.