शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

सर्प मारून व्हायरल कराल तर कारवाईला सामोरे जाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST

कोल्हापूर : घरात अथवा परिसरात आलेला नाग, साप मारून त्याची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्या संशयितांवर आता वन ...

कोल्हापूर : घरात अथवा परिसरात आलेला नाग, साप मारून त्याची व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावरून व्हायरल करणाऱ्या संशयितांवर आता वन विभागासह प्राणीमित्रांची करडी नजर आहे. जर तुम्हाला साप मारुन त्याचा व्हिडीओ करायचा मोह आवरला नाही तर मात्र तुम्हाला पोलीस कोठडीत जावे लागणार आहे.

गेल्या चार दिवसांपासून उदगीर (लातूर) येथील एका संशयिताने साप मारून त्याची चित्रफित सोशल मीडियावरून व्हायरल केल्याप्रकरणी लातूर वन विभागाने एकाविरोधात कारवाई केली. याप्रकरणी सांगलीतील प्राणीमित्र ॲड. बसवराज होसगौडर यांनी व्हिडीओ जारी करणाऱ्यांचा शोध घेऊन तक्रार दाखल केली होती.

एका संशयिताने साप मारून त्याची चित्रफित सोशल मीडियावरून व्हायरल केली. हे चित्रिकरण राज्यासह देशभरात व्हायरल झाले होते. सांगलीतील प्राणीमित्र ॲड. बसवराज होसगौडर यांनीही ती पोस्ट पाहिली. त्यांनी पिपल्स फाॅर ॲनिमलच्या इतर कार्यकर्त्यांकडून माहिती घेत संशयिताचे नाव व पत्ता शोधून काढला. तर तो उदगीर (लातूर) येथील असल्याचे समजले. त्यांनी तातडीने लातूर वन विभागाशी संपर्क साधत त्याच्यावर कारवाईसाठी तक्रार दिली. त्यानुसार वनपाल टी. बी. वंजे यांनी संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली.

कोट

राज्यात अशाप्रकारे साप, नाग, वन्य पशू, पक्षी आणि पाळीव प्राण्यांना मारून त्याचे चित्रिकरण सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यांवर वन्यजीव कायद्यानुसार कारवाई करता येते. अशाप्रकारे प्राण्यांची हत्या करणाऱ्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये तीन ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा व १० ते २५ हजारांचा दंडही होऊ शकतो.

- ॲड. बसवराज होसगौडर, प्राणीमित्र, सांगली