शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

दारू पिल्यास पाच दिवस हाती झाडू !

By admin | Updated: December 18, 2014 00:10 IST

झाडलोटीची शिक्षा : काटेकोर अंमलबजावणीने वसाहत झाली दारूमुक्त

भीमगोंडा देसाई -कोल्हापूर --कोणालाही व्यसनाच्या विळख्यातून बाहेर काढणे सोपे नसते. मात्र, ते शिवधनुष्य उचगाव येथील फासेपारधी समाजातील पंचांसह ज्येष्ठ मंडळींनी उचलले आणि यशस्वीरीत्या पेलून समाजाला परिवर्तनाच्या वाटेवर आणून सोडले. २००९-१० मध्ये स्वच्छता मोहीम तर सुरू झाली होती. तिचे यश पाहून वसाहतीत दारू, गुटखा आणि जुगारबंदीचा निर्णय घेण्यात आला. दारू पिऊन येणाऱ्यास पाच दिवस वसाहतीत स्वच्छता करण्याची अनोखी शिक्षा ठरविण्यात आली. तिचा अंमल सुरू झाला. आज ही वसाहत दारूमुक्त बनली आहेहा निर्णय घेण्यामागे तशी पार्श्वभूमीही होती. फासेपारधी कुटुंबाची मिळकत जेमतेम. मोलमजुरी करून मिळविलेले पैसे व्यसनात घालायचे. पैशांसाठी पत्नीला मारझोड करायचे. प्रसंगी पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकायचे आणि दारू ढोसायची, असा दिनक्रम अनेक कुटुंबांचा होता. महिलांसह लहान मुलेही मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जाऊ लागली होती. व्यसनासाठी पैसे मिळविण्याकरिता वाट्टेल ते करण्याची प्रवृत्ती बळावली होती. भांडण-तंटे रोजचे बनले होते. सामाजिक स्वास्थ्य बिघडू लागले होते. ‘दारुड्यांची वसाहत’ अशी ओळख या वसाहतीची बनली होती. त्यामुळेच दारू, जुगार, गुटखाबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. परिणामी वसाहत दारूमुक्त आणि तंटामुक्त बनली आहे. नियोजनबद्ध विकासाच्या दिशेने वसाहतीची वाटचाल सुरू झाली आहे. (क्रमश:) अशी झाली दारूबंदी...-परिवर्तनाच्या वाटेवरपारधी समाजदारूबंदीसाठी प्रभावी प्रबोधनातून मनपरिवर्तन केले. दारू पिऊन आलेल्यास पाच दिवसांची स्वच्छता करण्याच्या शिक्षेची काटेकोर अंमलबजावणी केली. पहिल्यांदा महिन्याला चार ते पाचजण दारू पिऊन ोणारे मिळत होते. स्वच्छतेची शिक्षा भोगल्यानंतर ते पुन्हा दारू न पिण्याचा निर्धार करीत. अलीकडे अपवादात्मक असा एखादा दारू पिऊन आलेला असतो. वसाहतच दारू, जुगार, गुटखामुक्त झाल्यामुळे कुटुंबांचा आर्थिक स्तरही उंचावत आहे. भांडण, तंटेही बंद झाले आहेत.नवसाहत दारू, गुटखामुक्त झाली आहे. भांडण-तंटे नसल्यामुळे सामाजिक स्वास्थ्य चांगले राहत आहे. व्यसनावर होणारे पैसे वाचल्यामुळे कुटुंबांची आर्थिक उन्नती होत आहे. रोज सायंकाळी आम्ही ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीची चर्चा करतो. - मल्लू बाबू चव्हाण, रहिवासीदारूच्या पैशांतून दिवाळी.. वर्षापूर्वी रोज दारू पिण्यावरच्या खर्चात बचत करून वीस रुपयांप्रमाणे संकलित केले. एका वर्षात तब्बल चार लाख रुपये गोळा झाले. हे पैसे दिवाळीच्या तोंडावर संबंधित कुटुंबांना एकाचवेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते जाहीर कार्यक्रमात वाटप करण्यात आले. एकेका कुटुंबाला कमीत कमी हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे मिळाल्यामुळे दिवाळी आनंदात साजरी केली. दारूवर पैसे किती खर्च होत होते, याचीही जाणीव झाली.