शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

बाहेरचा ऊस आणल्यास पेटविणार

By admin | Updated: June 16, 2015 01:15 IST

विश्वास नेजदार यांचा इशारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजाराम कारखान्यावर मोर्चा; वादावादीचा प्रकार

कसबा बावडा : राजाराम सहकारी साखर कारखान्याची एकही वस्तू पंढरपूर अथवा बेडकिहाळ कारखान्याकडे गेल्यास संचालक मंडळाला चांगलेच कुडपणार, तसेच कारखान्याने कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणल्यास ट्रक उलथवून तो पेटवून दिला जाईल, असा इशारा कारखान्याचे माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी संचालक मंडळाला दिला. यावेळी आंदोलक व कारखाना व्यवस्थापन यांच्यात शाब्दिक वादावादी झाल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. शेतकऱ्यांना त्यांच्या ५ कोटी ३२ लाख रुपयांच्या ठेवी व त्याचे व्याज त्वरित मिळावे, सन २०१४/१५ हंगामासाठी पाठविलेल्या उसाचे बिल त्वरित मिळावे, उसाचा करार करून घ्यावा, कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळपास आणू नये या व अन्य इतर मागण्यांसाठी सोमवारी विश्वास नेजदार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यावर मोर्चा काढण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने, संचालक दिलीप पाटील, दिलीप उलपे, हरीश चौगले, कार्यकारी संचालक आर. सी. पाटील हे ऊस उत्पादक शेतकरी यांच्या मोर्चाला सामोरे गेले. त्यांनाच थेट आव्हान देत माजी अध्यक्ष विश्वास नेजदार यांनी कारखाना काय तुमच्या बाचा हाय? असा प्रश्न करत धारेवर धरले. कारखाना कर्जमुक्त आहे. कारखान्याचा कारभार स्वच्छ व पारदर्शी आहे, तर ठेवी आणि बिले का देत नाही, असा सवाल केला.कारखान्यामध्ये पी. जी. मेढे हे कित्येक वर्षांपूर्वी निवृत्त झाले असताना त्यांच्यावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपये कशाला खर्च करता, असा सवाल करत कारखान्याला दोन-दोन एम. डी. ठेवण्याची गरज नाही. सेवानिवृत्त झालेल्या परंतु पुन्हा कामावर घेतलेल्या अधिकाऱ्यांना का कमी करत नाही, असा सवालही नेजदार यांनी केला. यावेळी आंदोलक शेतकरी व कारखाना व्यवस्थापनात शाब्दिक वादावादी झाली. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तणाव निवळला. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कारभाराचे वाभाडे काढले. काही शेतकऱ्यांच्या उसाचा करार जाणून-बुजून केला जात नाही, बावड्यातील ऊस उशिरा तोडला जातो, असा आरोपही यावेळी करण्यात आला. या गोंधळातच अध्यक्ष माने यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मोहन सालपे, नगरसेवक प्रदीप उलपे, अजित पोवार, नितीन पारखे, श्रीहरी पाटील, प्रल्हाद उलपे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)बोर्ड मीटिंगपुढे विषय ठेवणारयेत्या १७ तारखेला कारखान्याची बोर्ड मीटिंग आहे, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेतला जाईल, असे कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव माने यांनी स्पष्ट केले. सूडबुद्धीने कोणाचाही करार डावलला जात नाही. साखरेचे दर पडल्याने काहीशी अडचण आहे. तुमच्या काळातील सभासदकाही सभासदांच्या नावावर एक गुंठा जमीन नसताना त्यांना सभासद कसे केले? असा सवाल नेजदार यांनी उपस्थित केला. यावर माजी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी तुमच्या काळातच असे सभासद झाले आहेत, असे म्हणताच वादाला तोंड फुटले.कवळी गाजरं...कारखाना परिसरात चांगला व परिपक्व ऊस उपलब्ध असताना ८ ते १० महिन्यांची कवळी गाजरं (ऊस) रात्रीच्या वेळी आणून त्याने गाळप केले जाते. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसतो, असा आरोप यावेळी नेजदार यांनी केला.