शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

'ग्रेमॅक्स'ला जागा दिली तर जनआंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:16 IST

गडहिंग्लज : गडहिंग्लज परिसराच्या औद्योगिकरणाचा खेळखंडोबा केलेल्या 'ग्रेमॅक्स'ला पुन्हा जागा दिली, तर जनआंदोलन उभारून कंपनीला हद्दपार करण्यात येईल, असा ...

गडहिंग्लज : गडहिंग्लज परिसराच्या औद्योगिकरणाचा खेळखंडोबा केलेल्या 'ग्रेमॅक्स'ला पुन्हा जागा दिली, तर जनआंदोलन उभारून कंपनीला हद्दपार करण्यात येईल, असा इशारा जनता दलातर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पाठविलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.

जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक व सहकाऱ्यांनी शिष्टमंडळाने भेटून येथील प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना हे निवेदन दिले.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील व जिल्हाधिकारी यांनाही हे निवेदन पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, ग्रेमॅक्स कंपनीबद्दल जनतेत प्रचंड असंतोष असल्यामुळे 'ग्रेमॅक्स'ला अजिबात जागा देऊ नये, त्याऐवजी ती जागा सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना वाटप करावी. त्यातूनच गडहिंग्लज विभागाच्या औद्योगिक विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.

निवेदनावर, नगराध्यक्षा प्रा. स्वाती कोरी, जनता दलाचे कार्याध्यक्ष उदय कदम, नगरसेवक बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, नितीन देसाई, सुनीता पाटील, क्रांतिदेवी शिवणे व वीणा कापसे, राजेंद्र भुईंबर, गंगाराम विभुते, सलीम नदाफ आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

फोटो ओळी :

गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना जनता दलाचे तालुकाध्यक्ष बाळेश नाईक यांनी निवेदन दिले. यावेळी उदय कदम, राजेंद्र भुईंबर, गंगाराम विभुते आदी उपस्थित होते.

क्रमांक : ०७०७२०२१-गड-०६