शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिदानाने दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

By admin | Updated: September 19, 2015 00:03 IST

पर्यावरणपूरक गणेशोत्सव : आवाहनाला प्रतिसाद देत शहरात सुमारे ६४० गणेशमूर्ती दान

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया...’चा गजर आणि चिरमुऱ्यांची उधळण करीत दीड दिवसाचा पाहुणा म्हणून आलेल्या गणपती बाप्पाला भाविकांनी शुक्रवारी जड अंत:करणाने निरोप दिला. दुष्काळाचे गांभीर्य आणि गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केल्या जात असलेल्या प्रबोधनाला प्रतिसाद देत भाविकांनी मूर्तिदानाला प्राधान्य देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. पंचगंगा घाट, रंकाळा, कोटीतीर्थ, राजाराम बंधारा अशा विविध जलाशयांच्या ठिकाणी मिळून ६४० गणेशमूर्ती दान झाल्या. काही कुटुंबांमध्ये विशेषत: ब्राह्मण कुटुंबांत दीड दिवसांतच गणेशमूर्ती विसर्जित केली जाते. गुरुवारीच घरी आलेल्या गणपतीला अवघ्या दीड दिवसांत या कुटुंबांनी निरोप दिला. पंचगंगा घाट येथे पंचगंगा घाट संवर्धन समितीतर्फे कृत्रिम विसर्जन कुंडाची सोय करण्यात आली होती. येथे मूर्तीचे विसर्जन करून भाविक ती दान करत होते. या पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबद्दल भाविकांना अभिनंदनाचे प्रमाणपत्र दिले जात होते. अवनि संस्थेच्यावतीने निर्माल्य व मूर्तींचे संकलन केले.रंकाळा परिसरात सर्वाधिक गणेशमूर्ती दान करण्यात आल्या. यासह कोटीतीर्थ, राजाराम बंधारा, राजाराम तलाव या सर्व ठिकाणी महापालिकेच्यावतीने मूर्तिदान स्वीकारले जात होते. घरगुती गणपतींशिवाय बालमंडळे, अपार्टमेंटमधील गणपती, असे मिळून दिवसभरात ६४० हून अधिक गणेशमूर्तींचे दान करण्यात आले. सुज्ञ, सुजाण कोल्हापूरकर...पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विसर्जनासाठी पंचगंगा घाट संवर्धन समितीतर्फे आवाहन करण्यात येत होते. त्याला प्रतिसाद देत पंचगंगा घाटावर ४० मूर्तींचे विसर्जन झाले. पर्यावरणपूरक विसर्जन केल्याबद्दल संबंधितांचा समितीने ‘सुज्ञ सुजाण कोल्हापूरकर’ असे प्रमाणपत्र देऊन गौरव केला. समितीचे अध्यक्ष महेंद्र कामत, उपाध्यक्ष विजय ससे, सचिव जयश्री तोडकर, खजानिस प्रमोद पुंगावकर, चंद्रकांत परुळेकर, कौशल शिर्के, कुणाल पाटील, जिल्हा हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेशकर हे पर्यावरणपूरक विसर्जनासाठी आवाहन करीत होते. दुसऱ्या दिवशीही गणेश आगमनाच्या मिरवणुकाकोल्हापूर : गणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवशीही काही मंडळांच्या गणेश आगमनाच्या मिरवणुका सुरूच होत्या. पारंपरिक ढोल-ताशांसह डीजेच्या छोट्या पण दणदणीत आवाजाच्या सिस्टीमही या मिरवणुकीत मोठ्या मंडळांनी आणल्या होत्या. गेले काही महिने शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, कुंभारगल्ली (गंगावेश), आदी ठिकाणी तरुण मंडळांच्या गणेशमूर्ती दुसऱ्या दिवशीही तयार करण्याचे काम सुरू आहे. मंडळांच्या गणेशमूर्ती जसजशा तयार होतील, तशी मंडळे या मूर्ती मिरवणुकांनी आपल्या मंडपांकडे नेत आहेत. काही मंडळांना गणेशमूर्ती नेण्यासाठी गुरुवारी वाहने उपलब्ध झाली नाहीत, तर काही मंडळांना डॉल्बी सिस्टीम आणि ढोल-ताशे पथकांचे दर परवडत नसल्याने या मंडळांनी दुसऱ्या दिवशी दर कमी येत असल्याने दुसऱ्या दिवशीच गणपती नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक मंडळांनी गणेशमूर्ती शुक्रवारी सायंकाळी नेल्या. शुक्रवारी शिवाजी चौकाचा ‘महागणपती’ खुला करण्यात आला. या ठिकाणी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती.