शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

स्वत:मधील ताकद ओळखावी

By admin | Updated: January 12, 2016 00:36 IST

ज्ञानेश्वर मुळे : कागलच्या डी. आर. माने महाविद्यालयात व्याख्यान

कागल : जगभरात जवळपास ७०० कोटी लोक आहेत, मात्र ते स्वतंत्र चेहऱ्याचे आहेत. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला अद्वितीय असा गुण दिला आहे, पण ही अद्वितीय ताकद काय आहे ही शोधायची जबाबदारी ज्याच्या त्याच्यावर सोपवून ‘मेख’ मारली आहे. म्हणून आपल्यातील अद्वितीय गुणांच्या शोधासाठी ज्ञान-जिज्ञासा आवश्यक असते, असे प्रतिपादन डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.येथील डी. आर. माने महाविद्यालयात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दि कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव भैया माने होते. बाळ कालेकर, मीनाताई घाग, अजित पाटील प्रमुख उपस्थित होते.मुळे म्हणाले, कच्चा माल फार चांगला असतो, पण रसवंतीगृहात गेल्यावर चोथा होऊन बाहेर पडतो, तशी अवस्था कधी कधी शिक्षणामुळेही होते; म्हणून नुसता अभ्यास करून उत्तीर्ण होण्यापेक्षा अंतर्मनातील ज्ञानज्योत पेटण्यासाठी शिक्षण घेतले पाहिजे. असे झाले तर आपला चोथा कदापीही होणार नाही. प्रगतीपथावर जायचे असेल तर सुरवंट जसा कोशाबाहेर पडतो आणि त्याचे फुुलपाखरात रूपांतर होते, तसे आपण कोशाबाहेर पडायला हवे. आदर्श डोळ््यांसमोर असलाच पाहिजे, पण दुसरे करतात म्हणून तेच करण्याची आवश्यकता नाही. तुमच्या मनाला जे पटेल, भावेल, तेच करा. त्यासाठी तुमचे अद्वितीय याचा शोध घ्या. प्राचार्य डॉ. प्रवीण चौगुले यांनी स्वागत करून प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी भैया माने यांचेही भाषण झाले. डॉ. नीला जोशी यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हसीना मालदार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)