शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यासमोर आदर्श : लोकसहभागातून स्वच्छता अन् समृद्धीकडे वाटचाल

By admin | Updated: December 16, 2014 00:57 IST

अशी चालते स्वच्छता मोहीम

भीमगोंडा देसाई - कोल्हापूर -कोणतीही व्यक्ती जन्मजात गुन्हेगार नसते, मात्र फासेपारधी समाजावर गुन्हेगारीचा शिक्का जन्मजातच पडलेला. हा शिक्का पुसून टाकण्याचे आणि राज्यभरातील आपल्या समाजबांधवांसमोर आदर्श ठेवण्याचे काम उचगाव, ता. करवीर येथील फासेपारधी वसाहतीने केले आहे. दारू, जुगार, गुटखाबंदीसह ही वसाहत तंटामुक्तही बनली आहे. या वसाहतीला अंधारातून प्रकाशाकडे आणि स्वच्छतेतून समृद्धीकडे नेणाऱ्या त्यांच्या पंचमंडळींना म्हणूनच सलाम ! कोल्हापूर शहरापासून अवघ्या चार-पाच किलोमीटर अंतरावर परिवर्तनाच्या वाटेवरील ही वसाहत बारा एकरात वसली आहे. ‘उचगाव पूर्व शांतीनगर समस्त फासेपारधी समाज’ असे तिचे नाव. २०० कुटुंबे तिथे राहतात. (पान १० वर)वसाहत आदर्श बनविण्यासाठी तरुणांचाही सक्रिय सहभाग असतो. आदिवासीचं जिणं पदरी आलेला समाज आता प्रगतीच्या दिशेने गतीने वाटचाल करत आहे. परदेशात पर्यटनासाठी जाण्यापर्यंत काहीजणांनी मजल मारली आहे. - राजू काळे, रहिवासीअशी चालते स्वच्छता मोहीमउचगावातील फासेपारधी समाजाने स्वच्छतेला स्वत:पासून सुरुवात केली. वसाहतीमधील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यासाठी प्रत्येक कुटुंंबातील एक व्यक्ती याप्रमाणे ३२ जणांचा एक ग्रुप तयार करण्यात आला आहे. सहा ग्रुप आहेत.प्रत्येक ग्रुप महिन्यातील ५, १०, १५, २०, २५, ३० या तारखेला सकाळी ९ ते सायंकाळी पाचपर्यंत एक दिवस स्वच्छता करतो. ग्रुपमध्ये नोकरदार, शेतमजूर, महिला, युवकांचा सहभाग आहे. पाच वर्षांपासून अशाप्रकारे स्वच्छतेचा कार्यक्रम न चुकता राबविला जात आहे. परिणामी प्रत्येक कुटुंबालाच आता स्वच्छतेची सवय जडली आहे. प्रत्येक ग्रुपला आपणाला कधी स्वच्छता करायची आहे, ते कळावे यासाठी वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकाप्रमाणे स्वत:हूनच संबंधित ग्रुप स्वच्छता करतो. स्वच्छतेबरोबरच झाडांना पाणी घालणे, एखाद्या घराच्या परिसरात अस्वच्छता असली तरी ती स्वच्छ केली जाते. परिवर्तनाच्या वाटेवरपारधी समाज