शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

आयसीयुचे बेड फुल्ल, ऑक्सिजनचे दोनशे उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

कोल्हापूर : जिल्ह्याला दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत असून गुरुवारी सायंकाळपर्यंत कोरोना रुग्णांवरील उपचारासाठीचे शासकीय रुग्णालयातील आयसीयु बेड संपले आहेत. ...

कोल्हापूर : जिल्ह्याला दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा वाढत असून गुरुवारी सायंकाळपर्यंत कोरोना रुग्णांवरील उपचारासाठीचे शासकीय रुग्णालयातील आयसीयु बेड संपले आहेत. खासगी रुग्णालयातील चार बेड शिल्लक होते. ऑक्सिजनचे मात्र २३९ बेड उपलब्ध होते. सध्या वॉर रूमकडे आयसीयु बेडचीच विचारणा होत असून ते मिळत नाहीत, अशी स्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयांनी हे बेड वाढविण्याची गरज आहे.

जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू असून बुधवारी कोरोनाबाधितांचा आकडा १५०० च्या पुढे गेला होता. त्यात अनेक रुग्ण परिस्थिती गंभीर बनल्यानंतरच रुग्णालयात येत असल्याने आयसीयु बेडची संख्या अपुरी पडत आहे. रुग्णांना बेडची माहिती मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वॉर रूम सुरू करण्यात आली असून येथून २४ तास सेवा दिली जात आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांतील सर्व बेड्‌सची माहिती येथे एकत्रित केली जाते व डॅश बोर्डवर टाकली जाते. त्यामुळे नातेवाईकांना त्याक्षणी कोणत्या रुग्णालयात किती व कोणते बेड शिल्लक आहेत, याची त्वरित माहिती मिळते.

वॉर रूमला रोज बेडच्या चौकशीसाठी अंदाजे दोनशेच्या आसपास फोन येतात. त्यापैकी किमान ५० फोन हे आयसीयु बेडसाठी असतात. त्यानंतर विचारणा होते ती ऑक्सिजन बेडची. नॉन ऑक्सिजन बेडसाठी फार कमी प्रमाणात चौकशी होते.

---

बेडची स्थिती (गुरुवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची)

बेडचा प्रकार : उपलब्ध बेड

खासगी : शासकीय

आयसीयु : ०४ : ००

ऑक्सिजन : ११४ : १२५

नॉन ऑक्सिजन : २६८ : ६५०

एकूण : ३८६ : ७७५

--

माहिती येथून मिळवा

कोविड कोल्हापूर डॉट कॉम या वेबसाईटवर बेड मॅनेजमेंट डॅश बोर्डवर क्लिक केले की, शासकीय-खासगी रुग्णालयांतील आयसीयु, ऑक्सिजन व नॉन ऑक्सिजन बेड्‌सची माहिती मिळते. याशिवाय तुम्ही वॉर रूममधील ९३५६७१६५६३, ९३५६७३२७२८, ९३५६७१३३३० या नंबरवर फोन करू शकता.

--

क्षणा-क्षणाला बदल

रुग्णालयातील एखाद्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला किंवा त्याचा मृत्यू झाला की, उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर बेडवर त्याच रुग्णालयातील गंभीर रुग्णाला शिफ्ट केले जाते. त्यामुळे तासाभरापूर्वी रुग्णालयात आयसीयु बेड शिल्लक दिसत असेल, तर नंतर तो भरलेला असताे. वॉर रूमकडे चौकशीच इतक्या मोठ्या प्रमाणात होते की, कुणाला बेड द्यायचा हा प्रश्न येतो. त्यामुळे फोन आला की, रुग्णाचे नाव, पत्ता व ऑक्सिजन लेवलची नोंद केली जाते. त्यापैकी अतिगंभीर रुग्णाच्या नातेवाईकांना फोन केला जातो.

--