शहरं
Join us  
Trending Stories
1
Trump Putin Call: '...तोपर्यंत युद्ध थांबवणार नाही'; व्लादिमीर पुतीन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना ठणकावलं
2
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
3
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
4
शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर पती पराग त्यागीची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला- "आजूबाजूच्या अफवांमध्ये.."
5
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
6
"एअर इंडियाने कोलंबोला जातोय, इच्छापत्र बनवून ठेवलंय...", प्रसिद्ध अभिनेत्याने शेअर केला Video
7
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
9
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
10
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
11
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
12
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
13
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
14
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
15
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
16
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
17
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
18
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
19
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
20
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप

इचलकरंजीत ‘वास्तू २०१५’चे शानदार उद्घाटन

By admin | Updated: May 3, 2015 01:01 IST

८० स्टॉल्स उपलब्ध : बांधकाममंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम

इचलकरंजी : येथील ‘वास्तू २०१५’ या बांधकामविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे होते. आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. ४ मे पर्यंत हे प्रदर्शन चालणार असून, यामध्ये ८० हून अधिक स्टॉल उपलब्ध आहेत. क्रेडाई इचलकरंजी, असोसिएशन आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्ट, सिमेंट डिलर्स असोसिएशन, बिल्डर्स असोसिएशन, बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स असोसिएशन आणि बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन आॅफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हुलगेश्वरी मिल कंपौंडमध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे प्रायोजक ट्रोजन प्लायवूड विनायक मार्केटिंग कंपनी व भारत स्टील इंडस्ट्रीज, सिद्धनाथ रेडिमिक्स प्रा.लि., कजारिया टाईल्स, जे. के. सुपर सिमेंट, पुण्य पर्व आणि रामसिन्हा ग्रुप हे आहेत. कार्यक्रमात ‘वास्तू २०१५’चे अध्यक्ष रमेश मर्दा यांनी स्वागत केले. क्रेडाईचे अध्यक्ष नितीन धूत यांनी प्रास्ताविक केले. यामध्ये बांधकामविषयक सद्य:स्थिती, भावी संकल्पना, शहर व परिसरात वीसहून अधिक सुरू असलेले गृह प्रकल्प, त्यांच्या योजना याची माहिती देऊन प्रदर्शनात आधुनिक यंत्रसामग्री, इलेक्ट्रिक किचन वेअर यासह बांधकामसंबंधी सर्व आवश्यक साहित्यांचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. दरम्यान, ‘क्रेडाई है तो भरोसा है’ या मुखपत्राचे, तसेच इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्ट असोसिएशनच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर आमदार सुरेश हाळवणकर व माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आदींची भाषणे झाली. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, ललित गांधी, अनिल डाळ्या, सतीश डाळ्या, जहीर सौदागर, सय्यद गफारी, संजय रुग्गे, आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (वार्ताहर)