शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत मंदिरे हटविली

By admin | Updated: May 14, 2016 01:34 IST

२००९ नंतरची मंदिरे : काही ठिकाणी विरोध; दिवसभर नगरपालिकेची ‘नॉन स्टॉप’ मोहीम

इचलकरंजी : शहरात विविध ठिकाणी असलेली सन २००९ नंतरची १५ धार्मिक स्थळे शुक्रवारी नगरपालिकेने पोलिस बंदोबस्तात काढली. दरम्यान, लालनगर व आवाडे सबस्टेशनजवळील शेळके मळा येथे मंदिरे हटविताना नागरिकांनी विरोध केला. तर काही ठिकाणी नागरिकांनी स्वत:हून धार्मिक स्थळे काढून घेतली. सर्वोच्च न्यायालयाने सन २००९ नंतर सार्वजनिक ठिकाणी बांधण्यात आलेली धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे इचलकरंजी नगरपालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये एकूण १२८ पैकी १६ मंदिरे सन २००९ नंतरची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही १६ मंदिरे निष्कासित करण्याचा अहवाल तयार केला होता. त्यासंदर्भात नगरपालिकेमध्ये सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीनंतर १६ मंदिरे हटविण्याचे पालिकेकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून नगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने पोलीस बंदोबस्तासह मंदिरे हटविण्याची मोहीम हाती घेतली. या मोहिमेत मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगरअभियंता भाऊसाहेब पाटील, शिवाजी जगताप, संजय बागडे, विजय पाटील, आदींसह अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. पथकाने दिवसभर सलग कारवाई करत १५ मंदिरे हटविली. यामध्ये मंदिरातील देवांची मूर्ती संबंधितांकडे देऊन मंदिरे जेसीबी मशीनने जमीनदोस्त करण्यात आली. आवाडे सबस्टेशन जवळील मंदिर व लालनगर येथील मंदिर हटविताना परिसरातील नागरिकांनी विरोध केला. मंदिरासमोर ठिय्या मारून मंदिर हटवू देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावेळी पोलिस बळाचा वापर करीत नागरिकांना बाजूला करत पालिकेने मंदिरे हटविली. काही ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंदिर शेजारच्या जागेत हलविण्याची आश्वासने देत कारवाई केली. दिवसभरात १५ मंदिरे हटविण्यात आली असून, शिवाजीनगर परिसरातील एक मंदिर राहिले आहे. ते आज, शनिवारी हटविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त मुख्याधिकारी पोतदार यांनी सांगितले. (वार्ताहर)