इचलकरंजी : पुणे शिक्षक मतदारसंघ व पदवीधर मतदारसंघाचे दोन्ही उमेदवार निवडून आल्याच्या जल्लोषात गुरुवारी (दि. ३) येथील के. एल. मलाबादे चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी नगरसेवक राहुल खंजिरे, मदन कारंडे, संजय कांबळे, महादेव गौड, भाऊसाहेब आवळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
(फोटो ओळी)
०४१२२०२०-आयसीएच-०१
इचलकरंजीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी के. एल. मलाबादे चौकात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
(छाया - उत्तम पाटील)