शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

इचलकरंजीत घरकुलासाठी मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: June 1, 2016 01:37 IST

पाच तास आंदोलन : लेखी आश्वासनानंतर मागे

इचलकरंजी : येथील जयभीम झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांना सरकारच्या पुनर्वसन योजनेतील तयार घरकुलांचा ताबा मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ व मक्तेदार एन. आर. शहा यांना तब्बल पाच तास घेराव घातला. या आंदोलनातील चर्चेवेळी आंदोलक व मक्तेदार शहा यांच्यात जोरदार वाद होत असल्याने या बैठकीत वारंवार गोंधळ उडत होता. यावेळी झालेल्या चर्चेत येत्या चार महिन्यांत तेरा इमारतींचे काम पूर्ण करून त्यातील ६१२ लाभार्थ्यांना घरकुलांचा ताबा देण्याचे लेखी मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतले.जयभीम झोपडपट्टीमधील ७२० लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरकुलांची योजना राबविली जात आहे. त्यातील ६१२ लाभार्थ्यांसाठी घरकुले तयार असलेल्या तेरा इमारती अंतिम टप्प्यात येऊनही त्यांचे काम दीड महिने थांबले आहे. सध्याच्या दर सूचीप्रमाणे बांधकामातील दराचा फरक व ५७ लाख रुपयांचे प्रलंबित बिल ताबडतोब मिळावे, अशी मागणी शहा यांनी केली. घरकुलांच्या तेरा इमारती बांधण्याचे काम चार वर्षे सुरू आहे. सध्या या इमारती अंतिम टप्प्यात असूनसुद्धा मक्तेदार काम बंद ठेवून लाभार्थी व नगरपालिकेला अडचणीत आणतात. यामुळे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी लाभार्थ्यांना माहिती देऊन त्यांच्यासह मंगळवारी बारा वाजण्याच्या सुमारास नगरपालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी डॉ. रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगरअभियंता भाऊसाहेब पाटील यांना घेराव घातला. मक्तेदारांना बोलावून त्यांच्याशी चर्चा करून हा विषय संपविण्याचे ठरले. याप्रमाणे मक्तेदार शहा व अभियंता युवराज पाटील यांना बैठकीत बोलाविले. त्यावेळी बांधकामातील दर फरक व ५७ लाख रुपयांचे बिल मिळाल्याशिवाय काम चालू करणार नाही, असे मक्तेदाराने सांगितले. त्यावेळी संतप्त लाभार्थ्यांनी मक्तेदाराला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे बैठकीत गोंधळ उडाला. अखेर नगरसेवक चोपडे व मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी हस्तक्षेप करून ५७ लाख रुपयांचे बिल देण्यात येईल, मात्र दर फरकाबाबत नंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितल्यामुळे गोंधळ थांबला. चर्चेत कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील, बांधकाम सभापती लतीफ गैबान, सागर चाळके, नाना पारडे, आदींनी भाग घेतला.