शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीचा पाणीपुरवठा तोडणार ?

By admin | Updated: April 23, 2015 00:59 IST

पाणीपट्टीची थकबाकी : पाटबंधारेकडून १२.७३ कोटींची मागणी

इचलकरंजी : नगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना पाटबंधारे खात्याने बारा कोटी ७३ लाख रुपयांच्या पाणीपट्टीच्या थकबाकीची रक्कम वसुलीची इचलकरंजी नगरपालिकेकडे मागणी केली आहे. परिणामी शहराचा नळ पाणीपुरवठा तोडला जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने खळबळ उडाली आहे.गेल्या चौदा वर्षांपासून इचलकरंजी नगरपालिकेकडे पाणीपट्टीची थकबाकी प्रलंबित राहिली आहे. ही थकबाकी औद्योगिक व घरगुती वापर या तांत्रिक मुद्द्यांमुळे वाढत चालली आहे. याबाबत यापूर्वी पाटबंधारे मंत्रालयापर्यंत संयुक्त बैठका होऊनसुद्धा त्याबाबतचा कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने शहराचा पाणीपुरवठा तोडण्याची तलवार टांगली गेली आहे. इचलकरंजी शहरास कृष्णा व पंचगंगा अशा दोन्ही नद्यांतून पाण्याचा उपसा केला जातो. मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून कृष्णा नदीतून घेण्यात येणाऱ्या पाण्यासाठी वार्षिक सव्वा दोन कोटी रुपये, तर शहरालगत असलेल्या पंचगंगा नदीतून पाणी घेण्यासाठी ४० लाख रुपयांची पाणीपट्टी पाटबंधारे खात्याला देण्यात येते. अशा पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरामध्ये घरगुती व औद्योगिक नळ पाण्याचे ग्राहक असल्यामुळे पाटबंधारे खात्याकडून हा तांत्रिक मुद्दा उचलून धरला जात आहे आणि अन्य नगरपालिकांपेक्षा इचलकरंजी नगरपालिकेची पाणीपट्टी जादा दराने आकारली जाते. अन्य नगरपालिकांप्रमाणे पाणीपट्टी भरली जाते. त्यात येणाऱ्या फरकाची रक्कम तेरा कोटी २७ लाख ४२ हजार इतकी झाली आहे. त्यातील ४९ लाख ८८ हजार रुपये भरण्यात आल्यामुळे अद्यापही बारा कोटी ७३ लाख ३९ हजार रुपये थकीत आहेत. ती भरण्यासाठी पाटबंधारे खात्याने वारंवार स्मरणपत्रे देऊन तगादा लावला आहे.(प्रतिनिधी)नगरपालिकेच्या तिजोरीत खडखडाटदरम्यान, नगरपालिकेच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीमुळे तिजोरीमध्ये खडखडाट झाला आहे. मागील आठवड्यातच पालिकेच्या विविध विभागांकडे असलेल्या मक्तेदारांकडून आग्रह धरण्यात आल्यामुळे एक कोटी रुपये मक्तेदारांना देण्यात आले. त्यामुळे पाटबंधारे खात्याकडून शहराचा पाणीपुरवठा तोडला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.