शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजी येथे मुख्याधिकाऱ्यांना घेराव

By admin | Updated: December 11, 2014 23:50 IST

घरकुलांचा प्रश्न : संतप्त लाभार्थ्यांची निदर्शने

इचलकरंजी : रमाई आवास घरकुल योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्धांना घरकुले बांधून देण्याकामी संबंधित मक्तेदार दिरंगाई करीत आहे. त्यामुळे नगरपालिकेने फेरनिविदा प्रसिद्ध करून योग्य मक्तेदार नेमावा, अशी मागणी करीत लाभार्थी महिला-पुरूषांनी नगरपालिकेवर जोरदार निदर्शने केली. सत्तारूढ कॉँग्रेसचे नगरसेवक रवी रजपुते व संजय केंगार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी सुनील पवार यांना घेराव घातला आणि ठिय्या आंदोलन केले.शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांपैकी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांना मोफत घरकुले बांधून देण्यासाठी रमाई आवास घरकुल योजना घोषित केली असून, त्याबाबत इचलकरंजीतील १८१ लाभार्थ्यांना घरकुले बांधून देण्यात येत आहेत. शासनाच्या समाजकल्याण खात्याकडून ही घरकुले बांधून देण्यात येत असली तरी नगरपालिकेमार्फत निविदा देण्यात आली आहे. घरकुलांचा पायाभरणी समारंभ सप्टेंबर महिन्यात झाला असून, फक्त खड्डे काढण्याव्यतिरिक्त गेल्या तीन महिन्यांत कोणतेही काम झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लाभार्थ्यांनी नगरसेवक रजपुते व केंगार नेतृत्वाखाली आज, गुरूवारी नगरपालिकेवर येऊन जोरदार निदर्शने केली. यावेळी संबंधित मक्तेदाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.त्यानंतर आंदोलनकर्ते मुख्याधिकारी पवार यांच्या दालनात गेले. तेथे आंदोलनकर्ते लाभार्थ्यांच्या वतीने नगरसेवक रजपुते व केंगार यांनी बाजू मांडली. मक्तेदाराच्या हेकेखोरपणामुळे कामात दिरंगाई होत आहे. काही महिने कामात दिरंगाई करून पुन्हा वाढीव दर मागायचा, असा डाव मक्तेदाराचा आहे; पण वाढलेला आर्थिकभार लाभार्थी कोणत्या परिस्थितीत सहन करणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला. सुमारे पाऊणतास हे आंदोलन चालू होते. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, नगरसेविका प्रमिला जावळे व मंगल मुसळे उपस्थित होते. संबंधित मक्तेदाराला चार दिवस मुदतीची अंतिम नोटीस देण्यात येईल. त्याने काम चालू न केल्यास बयाणा व सुरक्षा ठेव जप्त करून नवीन मक्तेदार नेमण्याची प्रक्रिया केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी पवार यांनी दिले आणि त्यानंतर आंदोलन संपुष्टात आले. (प्रतिनिधी)‘लोकमत’चा दणका‘घरकुलांची फक्त पायाभरणीच’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ ने ९ डिसेंबरच्या अंकात इचलकरंजीतील या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबीयांची व्यथा मांडली होती. त्यास अनुसरून नगरसेवक व लाभार्थी यांनी आजचे हे आंदोलन केले. ‘लोकमत’ने नेमके दुखणे मांडून हा प्रश्न ऐरणीवर आणला, अशी चर्चा आंदोलनकर्त्यांमध्ये होती.