शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीला मुबलक लसीचा पुरवठा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात लसींचा पुरवठा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र, त्या प्रमाणात लसींचा पुरवठा अत्यल्प होत आहे. त्यामुळे शहरासाठी तातडीने अधिक प्रमाणात लसींचा पुरवठा करावा. १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.

शहरातील विविध भागांत सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. शहरात ४५ वर्षांवरील साधारणत: एक लाख ५ हजार ६३६ इतक्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्या अनुषंगाने १५ मेअखेर ४४ हजार ८७२ जणांना पहिला, तर तेरा हजार १४७ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. शहरातील कोरोनाचे वाढते प्रमाण पाहता उपलब्ध होणाऱ्या लसींचे प्रमाण अत्यंत कमी आहे. सहा केंद्रांद्वारे लसीकरण सुरू असल्याने गर्दीमुळे ज्येष्ठ नागरिकांना तासन्‌तास रांगेत उभे रहावे लागते. त्यासाठी लसींचा पुरवठा करावा. १८ ते ४४ या नागरिकांसाठी एकही लसीकरण केंद्र नाही, ते तातडीने सुरू करण्यात यावे. याशिवाय फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्यांना लस देण्याची सोय करावी.

तसेच शहरातील सहा लसीकरण केंद्रांवरील पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची माहिती, लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट व सध्या किती प्रमाणात झाले, याची आकडेवारी स्वामी यांनी सादर केली. या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री सतेज पाटील, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांनाही देण्यात आल्या आहेत.