शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत रोखले ‘पीके’चे प्रदर्शन

By admin | Updated: December 31, 2014 00:41 IST

हिंदुत्ववादी संघटना आक्रमक : चित्रपटाची पोस्टर्स फाडून पेटविली, बंदोबस्त तैनात

इचलकरंजी : येथील विविध हिंदुत्ववादी संघटनांनी ‘पीके’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी आणा, अशी मागणी करत शहरातील चार चित्रपटगृहांत सुरू असलेले खेळ बंद पाडले. तसेच शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले ‘पीके’ चे बोर्ड फाडून पेटवून देण्यात आले. या आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस यंत्रणेने मुख्य चौकांसह चित्रपटगृहांसमोर बंदोबस्त ठेवला होता.नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या आमीर खानच्या चित्रपटात हिंदू देव-देवतांची विटंबना करण्यात आली असून, हा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी विविध हिंदुत्ववादी संघटनांनी केली. सेन्सॉर बोर्डाने प्रदर्शनाला परवानगी दिल्यानंतर त्यातील दृश्ये कापता येणार नसल्याचे सांगितल्यानंतर पुन्हा हिंदुत्ववादी संघटनांनी प्रदर्शन बंद करा, अशी मागणी करत आंदोलनाला सुरुवात केली. आज, मंगळवारी इचलकरंजी परिसरातील वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे शहरात लावलेले ‘पीके’ चित्रपटाचे बोर्ड फाडून काढून, एकत्रित करून पेटवून दिले. तसेच शहरात ‘पीके’ चित्रपट सुरू असलेल्या चार चित्रपटगृहांत जाऊन दुपारी १२ ते ३ चे खेळ बंद पाडले. अचानक सुरू झालेल्या आंदोलनामुळे चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची चांगलीच धावपळ उडाली. चित्रपट पुन्हा सुरू केल्यास होणाऱ्या नुकसानीस थिएटर मालक जबाबदार राहतील, असा धमकी वजा इशाराही आंदोलकांनी दिला. यामुळे चित्रपटगृह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी चित्रपटगृह परिसरात, तसेच शहरातील प्रमुख चौकांत पोलीस बंदोबस्त तैनात केला. (प्रतिनिधी)गडहिंग्लजमध्येही ‘पीके’चे खेळ बंदगडहिंग्लज : हिंदू धर्माचा अपमान होणारे प्रसंग दाखवून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावतात म्हणून येथील सुभाष आणि मराठा चित्रमंदिरातील ‘पीके’ चित्रपटाचे खेळ हिंदू युवकांकडून बंद पाडण्यात आले. शिवाय निवेदनानंतरही चित्रपट दाखविल्यास ‘मोडतोड’ करण्याचा इशारा निवेदनातून चित्रपटगृह चालकांना देण्यात आला. निवेदनावर सतीश हळदकर, राहुल शिंदे, संजय पाटील, अवधूत फडणीस, रघुनाथ चव्हाण, साईनाथ लोंढे, आदींसह अन्य २२ जणांच्या स्वाक्षऱ्या आहेत.