शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीतील खुनाचा उलगडा

By admin | Updated: July 17, 2014 00:17 IST

आरोपी अल्पवयीन : आर्थिक देवघेव, ठार मारण्याची धमकी दिल्याने कृत्य

इचलकरंजी : येथील महादेव इराप्पा टकळगी या तरुणाच्या खूनप्रकरणी संशयित अल्पवयीन तरुणास शिवाजीनगर पोलिसांनी आज, बुधवारी अटक केली. लोकांची देणी भागविण्यासाठी वारंवार पैशांची मागणी करून जीवे मारण्याची धमकी देत असल्याच्या कारणावरून चिडून महादेवचा खून केल्याची कबुली संशयित आरोपीने दिली आहे.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, संबंधित संशयित अल्पवयीन आरोपी हा गावभाग, नरसोबा कट्टा, परीट गल्ली येथे राहतो. तो एका दूध डेअरीमध्ये कामगार आहे. मृत महादेव व अल्पवयीन संशयित आरोपी हे दोघे बऱ्याच वर्षांपासून मित्र आहेत. महादेव हा चैनीखोर असल्यामुळे त्याला पगार पुरत नव्हता. म्हणून त्याने अनेक ठिकाणी उसने पैसे घेतले होते. ते पैसे भागविण्यासाठी तो आरोपीकडे वारंवार पैशांची मागणी करीत होता. पंधरा दिवसांपूर्वी महादेव याने दहा हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. या कारणावरून त्यावेळी दोघांच्यात किरकोळ वादावादी झाली. त्यावेळी महादेव याने संबंधित आरोपीस किरकोळ मारहाणही केली होती. याचा राग मनात धरून आरोपीने महादेव आपल्याला मारण्याअगोदर आपणच त्याचा काटा काढू, असे मनात ठरवले.सोमवारी सायंकाळी संशयित आरोपीने महादेव याला मोबाईलवर फोन करून आज रात्री जेवायला जायचे आहे, असे सांगून बोलावले. महादेव कामावरून येऊन नरसोबा कट्टा चौकात आपल्या अन्य मित्रांसोबत बोलत थांबला होता. तेथून अल्पवयीन आरोपीने महादेव याला बोलावून सोबत घेऊन दोघेजण नदीवेस नाक्याजवळ असलेल्या पेट्रोल पंपाच्या बारजवळ आले. तेथे महादेव याने आरोपीकडून दारूसाठी पैसे घेतले. आरोपीने पैसे देऊन मी आत येणार नाही, तू पाठीमागच्या मोकळ्या जागेत दारू घेऊन ये, असे सांगून तो पुढे गेला. महादेव दारू घेऊन ठरलेल्या ठिकाणी गेला. तेथे महादेव याला दारू पाजवली. महादेव नशेत असताना संशयित आरोपीने त्याच्या मागील बाजूस जाऊन मोठा दगड घेऊन त्याच्या मानेच्या वरच्या बाजूला डोक्यात घातला. महादेव डाव्या बाजूवर कोसळला. नशेत असल्यामुळे त्याला काही समजायच्या आत आरोपीने सोबत आणलेल्या जांबियाने सपासप वार केले. दुसऱ्या बाजूला जाऊन पुन्हा वार केले. धुंदीत किती वार केले, हेही संशयित आरोपीच्या लक्षात आले नाही. बघता-बघता ४० ते ४२ वार करून हत्यार तेथेच टाकून संशयित फरार झाला.खून केल्यानंतर आरोपी मेन रोडला येऊन तेथून रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकलस्वारांकडे लिफ्ट घेऊन रांगोळी, रेंदाळ, यळगूड, सांगाव मार्गे कागल गाठले. कागल स्टॅण्डवर रात्र काढून सकाळी कर्नाटकातील खेबूड गावी आपल्या आत्त्याकडे गेला. पोलिसांनी तपासासाठी अन्य मित्रांकडे चौकशी करून माग काढत कर्नाटकातील खेबूड परिसरातून त्याला आज, बुधवारी अटक केली. (प्रतिनिधी)संशयित अल्पवयीन आरोपीने काही महिन्यांपूर्वी कर्नाटकातील चिंचली यात्रेतून हत्यार खरेदी केले होते. त्यानंतर गावभागातील धार लावणाऱ्यांकडून गेल्या आठवड्यात त्याने धार लावून घेतली व ठरवून खून केल्याची कबुली दिली.