शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत ‘हिवताप’ विभाग गाफील

By admin | Updated: June 8, 2016 00:42 IST

इंधनासाठी पैसेच नाहीत : डेंग्यू साथीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालकांच्या बैठकीत प्रकार उघड

इचलकरंजी : शहरात डेंग्यू तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात मिळत असल्यामुळे मागील आठवड्यात शहरात युद्धपातळीवर स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, औषध फवारणीसाठी शासनाच्या हिवताप प्रतिबंधक खात्याकडे इंधनासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक बाब आरोग्य खात्याचे जिल्हा उपसंचालक आर. बी. मुगळे यांनी मंगळवारी घेतलेल्या बैठकीत उजेडात आली. त्यामुळे बैठकीमध्ये काही वेळ खळबळ उडाली होती.गेल्या दीड महिन्यांपासून शहरामध्ये डेंग्यू तापाच्या आजाराचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे विशेषत: गावभागात डेंग्यूने चार रुग्णांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी शहरातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करून नगरपालिका व शासनाचे लक्ष वेधले होते. नगरपालिकेच्या आरोग्य खात्याने याबाबत घेतलेल्या सर्वेक्षणामध्ये पालिकेच्या दवाखान्यासह खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यू तापाचे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोनशेहून अधिक आढळून आली होती.अशा परिस्थितीमध्ये गुरुवारी (२ जून) हिवताप प्रतिबंधक खात्याचे सहायक संचालक महेश खलिपे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपालिका प्रशासन, आयजीएम रुग्णालयाकडील अधिकारी, हिवताप प्रतिबंधक खात्याचे अधिकारी, आदींची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये ५० पथके नेमून दररोज शंभर घरांचा सर्वे करून तापाच्या रुग्णांची नोंद करण्याचे ठरले. तर नजीकच्या पंधरा दिवसांत स्वच्छता मोहीम राबविण्याबरोबरच डास प्रतिबंधक औषध फवारणी व धूर फवारणी युद्धपातळीवर राबविण्याचा निर्णय घेतला. याशिवाय घरोघरी पाणी साठ्यांचे सर्वेक्षण करून डासांच्या अळ्या आढळल्यास टेमीफॉस औषध टाकण्याचा किंवा पाणी ओतून टाकण्याचेही निश्चित झाले. मंगळवारी आरोग्य विभागाचे जिल्हा उपसंचालक मुगळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख, सहायक संचालक डॉ. खलिपे, आयजीएम रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत देशमुख, आदींची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये आढावा घेत असताना डास प्रतिबंधक औषध फवारणी व धूर फवारणी करण्याच्या यंत्रांसाठी आवश्यक असलेल्या इंधनासाठी पैसेच नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीला आली. मात्र, इचलकरंजीतील डेंग्यू रुग्ण मिळत असल्याच्या गंभीर प्रकाराची दखल घेत उपसंचालक मुगळे यांनी इंधनासाठी पैसे तातडीने उपलब्ध करून घेऊन फवारणी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशा सूचना दिल्या. (प्रतिनिधी)