शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

इचलकरंजीत ४० हजार लोक वंचित

By admin | Updated: August 22, 2014 00:55 IST

नवीन भुयारी गटार योजना : योजनेच्या आराखड्याचे प्रकटनच नाही; ‘शविआ’च्या तक्रारीनंतर माहिती उजेडात

इचलकरंजी : साधारणत: आठ वर्षांपूर्वी सर्वेक्षण केलेल्या नवीन भुयारी गटार योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत असली तरी त्यानंतर वाढलेल्या चाळीस हजार लोकसंख्येच्या वसाहती या गटारीपासून वंचित राहणार आहेत. सन २००६ मध्ये झालेल्या भुयारी गटारीच्या सर्वेक्षणानंतर ही योजना तयार करण्यात आली तरी योजनेचा आराखडा नगरपालिकेने प्रसिद्ध केला नसल्याची वस्तुस्थिती पालिकेतील विरोधी शहर विकास आघाडीने उघडकीस आणली आहे.शहरासाठी पहिल्या टप्प्यातील भुयारी गटार योजना साधारणत: पंचवीस वर्षांपूर्वी कार्यान्वित झाली. त्यावेळी शहराची लोकसंख्या दीड लाख होती. दरम्यान, कबनूरची वाढीव वसाहत, यशवंत कॉलनी, भोने माळ, लिगाडे मळा, जवाहरनगर, भारतमाता हौसिंग सोसायटी, स्वामी अपार्टमेंट परिसर, इंदिरा कॉलनी असा व्यापक परिसर आणि शहापूर गाव असे इचलकरंजी हद्दीत समाविष्ट झाले. पूर्वीच्या गटार योजनेमध्ये दहा दशलक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करणारा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आहे. सध्या मात्र शहरातील सुमारे ४० दशलक्ष लिटर सांडपाणी गटारीतून वाहून जाते.सन २००६ मध्ये भुयारी गटार योजनेचे सर्वेक्षण झाले. त्यावेळी २ लाख ५६ हजार इतकी लोकसंख्या होती. पूर्वीच्या गटार योजनेशिवाय कबनूरची वाढीव वसाहत, शहापूर आणि इचलकरंजीचा तत्कालीन वॉर्ड नं. ९ व १० असा व्यापक परिसर विचारात घेऊन हे सर्वेक्षण करण्यात आले. दरम्यान, शहराच्या वाढत्या औद्योगिकीकरणाबरोबरच सन २००५-०६ पासून शहराच्या लोकसंख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. सन २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत २ लाख ८७ हजार इतकी लोकसंख्या नोंदविण्यात आली आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या २०१४ मध्ये ही लोकसंख्या तीन लाखांवर गेली असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे सन २००८ नंतर शहराच्या लोकसंख्येत किमान ४० हजार लोकांची भर पडली आहे. वाढलेल्या लोकसंख्येच्या वसाहती कलानगर, जुना चंदूर रोड, सुर्वे मळा, संत मळा, कबनूर-गांधी विकासनगर, यशवंत कॉलनी, पुजारी मळा, गणेशनगर-भाटले मळा, शहापूर-इंडस्ट्रियल इस्टेटचा परिसर, सहारानगर, आमराई रस्ता अशा व्यापक परिसरांमध्ये वसल्या आहेत. त्याचबरोबर टाकवडे रस्त्यावरील पी. बा. पाटील मळ्यातसुद्धा मोठी वसाहत सध्या वसलेली आहे. या परिसरांसाठी आवश्यक असलेल्या भुयारी गटार योजनेचा सध्याच्या राबविण्यात येणाऱ्या नवीन भुयारी गटार योजनेमध्ये अंतर्भाव नाही, अशी आश्चर्यजनक माहिती पालिकेतील शहर विकास आघाडीचे कार्याध्यक्ष अजित जाधव यांनी केलेल्या तक्रारीनंतर उजेडात आली आहे. (प्रतिनिधी)८२ कोटींची योजना८२ कोटी रुपये खर्चाची ही योजना असून, त्यामध्ये १११ किलोमीटर लांबीच्या भुयारी गटार योजना भूगर्भात बसविण्यात येणार आहेत. काळा ओढा व चंदूर ओढा या दोन ठिकाणी गटारीतील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. त्याची अनुक्रमे वीस दशलक्ष लिटर व दहा दशलक्ष लिटर अशी क्षमता आहे.