शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

माझा पराभव झाला नाही, तो केला गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:25 IST

(वीरेंद्र मंडलिक यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माझा ...

(वीरेंद्र मंडलिक यांचा फोटो वापरावा)

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत माझा पराभव झाला नसून, तो केला गेल्याची सल पराभूत उमेदवार वीरेंद्र संजय मंडलिक यांनी व्यक्त केली आहे. आम्ही मंडलिक आहोत, आम्हाला रडायला नाही, लढायला शिकवलं आहे आणि संघर्ष तर आमच्या कुंडलीतच आहे. मी पुन्हा उठून उभा राहीन, लढत राहीन, अशा आशावादही त्यांनी फेसबूकवरील पोस्टमध्ये व्यक्त केला आहे.

मंडलिक विरोधी आघाडीचे उमेदवार होते. एकाच कुटुंबातील दोन उमेदवार रिंगणात होते. त्याशिवाय दिवंगत नेते सदाशिवराव मंडलिक यांनी पुढाकार घेऊन सुरू केलेला महालक्ष्मी दूध संघ बंद पडल्याबाबतची नाराजीही वीरेंद्र यांच्या पराभवास कारणीभूत ठरली. परंतु त्याशिवायही कागल तालुक्यातून त्यांना वगळून सत्तारूढ गटाला उमेदवारास मतदान झाल्याची चर्चा सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर या पोस्टला महत्त्व आले आहे.

वीरेंद्र या पोस्टमध्ये म्हणतात, ‘‘माझे आजोबा सदाशिवराव मंडलिक व वडाचे झाड यांचं फार जुनं नातं आहे. मंडलिक साहेब नेहमी म्हणायचे, 'हे वडाचे झाड माझा गुरू आहे. या झाडाने मला बरंच काही शिकवलं. माझ्या सुरुवातीच्या निवडणुकीचे चिन्ह वडाचे झाड आणि माझं आयुष्य सुद्धा या वडाच्या झाडाप्रमाणेच.' वडाच्या झाडाच्या छायेखाली अनेकांना सावली मिळते, तसंच आयुष्य माझ्या आजोबांचं होतं. दिवंगत मंडलिक यांनाही त्यांच्या आयुष्यात संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळाले नाही. माझे वडील संजय मंडलिक यांनाही २००० ते २०१९ पर्यंत आयुष्यात अनेक चढ-उतार पाहावे लागले. त्यांच्याविरुद्ध बोट ठेवायला काही नाही, म्हणून आमचा महालक्ष्मी दूध संघ अडचणीत आणला. स्वतः सात वाजल्यानंतर काही करो, पण माझ्या वडिलांवर खोटेनाटे आरोप झाले तरी आम्ही खचलो नाही आणि मी देखील गोकुळच्या निवडणुकीतील पराभवाने खचणार नाही.’’