शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
2
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
3
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
4
इस्रायलने सीझफायर तोडले, ट्रम्प प्रचंड नाराज; म्हणाले, तातडीने पायलटना माघारी बोलवा...
5
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
7
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
8
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
9
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक
10
तुर्कीला धडा शिकवण्याची तयारी सुरू?; सर्वात मोठ्या शत्रूच्या देशात पोहचले भारतीय हवाई दल प्रमुख
11
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
12
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
13
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
14
डॅशिंग 'शिवा' खऱ्या आयुष्यात आहे खूपच बोल्ड; पूर्वा कौशिकचं नवं फोटोशूट पाहिलंत का?
15
Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल
16
Nuclear Weapon : कोणता देश अणुबॉम्ब बनवतोय अन् कोणता नाही? कसं आणि कोण ठेवतं लक्ष? जाणून घ्या...
17
“भास्कर जाधवांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले तर आनंद, मातोश्रीवरचा राग...”; कुणी दिला सल्ला?
18
दिलजीत दोसांझच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेत्रीची भूमिका, टीका झाल्यावर म्हणाला...
19
Rahul Gandhi :'निवडणुका नियमांनुसार होतात', राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे उत्तर; चर्चेसाठी बोलावले
20
अपघाताच्या एक दिवस आधी एअर इंडियाच्या सीईओंचा पगार ४६% वाढवला; आता किती पैसे मिळतात?

हुपरी सरपंचावर अविश्वास दाखल

By admin | Updated: November 25, 2014 00:30 IST

सदस्य सहलीवर : १७ पैकी १५ सदस्यांनी दिला ठराव

हुपरी : ग्रामपंचायतीच्या कारभारामध्ये इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करीत असल्याच्या कारणावरून हुपरी (ता. हातकणंगले) च्या सरपंच सुमन सर्जेराव हांडे यांच्याविरोधात तहसीलदार दीपक शिंदे यांच्याकडे १७ पैकी १५ सदस्यांनी आज, सोमवारी अविश्वास ठराव दाखल केला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ठरावावर सह्या करणारे सर्वच सदस्य सहलीसाठी अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत. रौप्यनगरीच्या सरपंचांवर अविश्वास ठराव येण्याची गेल्या ५० वर्षांपासूनची असणारी परंपरा यावेळी सत्यात उतरत असल्याची खात्री होत आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०१२ मध्ये होऊन माजी मंत्री प्रकाश आवाडे गटाला ९, राष्ट्रवादी कॉँग्रेस २, शिवसेना ३ व मनसे ३, अशा जाग मिळाल्या होत्या. सरपंचपदी आवाडे गटाच्या सुमन हांडे व उपसरपंचदी बाळासाहेब रणदिवे यांची निवड करण्यात आली होती. सरपंच हांडे यांना दिलेल्या मुदतीमध्ये त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आवाडे गटाने विरोधकांना हाताशी धरून अविश्वास ठराव आणण्याचा प्रयत्न चालविला होता. याबाबतची माहिती समजताच सरपंच हांडे यांनी सरपंचपदासह विरोधी गटातच उडी मारल्याने आवाडे गटाच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये समाजकल्याण सभापती किरण कांबळे, मनसेचे तालुकाध्यक्ष दौलत पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाठ यांनी ग्रामपंचायत कारभार व खुंटलेला ग्रामविकास यावर बैठक घेऊन सर्वांनीच सरपंच हांडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. त्यांना सरपंच पदावरून पायउतार करण्यासाठी सर्वांनी आपल्यातले मतभेद विसरून अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज, सोमवारी सरपंच हांडे यांच्या विरोधात १७ पैकी १५ सदस्यांनी तहसीलदार दीपक शिंदे यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला. दाखल केलल्या ठरावामध्ये आवाडे गट ७, शिवसेना ४, मनसे ३ व राष्ट्रवादी १ अशा १५ सदस्यांचा समावेश आहे. अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या ठरावावर सरपंच हांडे व राष्ट्रवादीच्या रेवती मनोज पाटील यांच्या सह्या नाहीत. या अविश्वास ठरावावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी खास सभा बोलविण्याचा आदेश तहसीलदार शिंदे यांनी दिला आहे. (वार्ताहर)