शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

दीड लाखाचा ‘नरक्या’ जप्त हणबरवाडी येथे तिघे ताब्यात : भुदरगड पोलिसांचा छापा

By admin | Updated: May 19, 2014 00:52 IST

गारगोटी : भुदरगड तालुक्यातील हणबरवाडी येथे भुदरगड पोलिसांनी छापा टाकून नरक्या वनस्पतीची २१ पोती जप्त केली. भारतीय बाजारपेठेत याची किंमत

 गारगोटी : भुदरगड तालुक्यातील हणबरवाडी येथे भुदरगड पोलिसांनी छापा टाकून नरक्या वनस्पतीची २१ पोती जप्त केली. भारतीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. अभिषेक प्रवीण पाटील, सागर शिवाजी पाटील, भिवा संतू पाटील (सर्व रा. हणबरवाडी) अशी तिघांनी नावे आहेत. कर्करोगावर सर्वांत उपयुक्त ठरणारी नरक्या वनस्पती भुदरगडच्या जंगलात विपुल प्रमाणात आढळते. वनखात्याच्या हातावर तुरी देऊन अनेक वेळा या वनस्पतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असते. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नरक्या ऊर्फ अमृता या वनस्पतीला मोठी मागणी असते. तिचे दरही लाखोंच्या पटीत वाढत असतात. गारगोटी परिसरात नरक्या वनस्पतीचा साठा असल्याची कुणकुण पोलीस उपनिरीक्षक विष्णू गायकवाड यांना लागली. आठवडाभर पाळत ठेवून उपनिरीक्षक राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भिवा संतू पाटील यांच्या घरावर छापा टाकला. यावेळी घरामागे नरक्या वनस्पतीने भरलेली २१ पोती आढळून आली. यामध्ये नरक्या वनस्पतीचे ५०६ किलो तुकडे आढळून आले. पोलिसांनी वनपाल चंद्रकांत नगारे, संजय भाट, आर. पी. बर्गे यांना पाचारण करून या वनस्पतीबाबत खात्री करून घेतली. पोलिसांनी जोरदार तपास मोहीम राबवून अभिषेक पाटील, सागर पाटील, भिवा पाटील (रा. हणबरवाडी) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी भुदरगड पोलिसांत गुन्हा नोंद झाला असून, पोलीस निरीक्षक बन्सी बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत पिंगळे, संजय मेटकर, धोंडिराम शिंदे, राजू सूर्यवंशी, हणमंत नाईक, आर. टी. जरग अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)