शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

सहायक वनसंरक्षक परीक्षेत देवर्डेचा लक्ष्मण कसेकर राज्यात प्रथम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 19:37 IST

देवर्डे (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षकपदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. अहमदनगरमधील रामदास विष्णू दौंड हे मागासवर्गीय प्रवर्गातून, तर महिला वर्गवारीमधून लातूर येथील प्रतिक्षा नानासाहेब काळे यांनी प्रथम क्रमांकाने यश मिळविले.

ठळक मुद्दे‘एमपीएससी’कडून निकाल जाहीर; वनसेवा मुख्य परीक्षामुलाखतीच्या तयारीसाठी ए. बी. फौंडेशनचे मार्गदर्शन लाभले. सध्या उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे.

कोल्हापूर : देवर्डे (ता. आजरा) येथील शेतकरी कुटुंबातील लक्ष्मण महादेव कसेकर याने सहायक वनसंरक्षकपदाच्या परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. अहमदनगरमधील रामदास विष्णू दौंड हे मागासवर्गीय प्रवर्गातून, तर महिला वर्गवारीमधून लातूर येथील प्रतिक्षा नानासाहेब काळे यांनी प्रथम क्रमांकाने यश मिळविले.

राज्य लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा निकाल शुक्रवारी आॅनलाईन जाहीर झाला.एमपीएससीकडून सहायक वनसंरक्षक (गट-अ) १६ आणि वनक्षेत्रपाल (गट-ब) ५३ पदांसाठी दि. २८ आॅक्टोबर २०१८ रोजी परीक्षा घेण्यात आली. त्याचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. देवर्डे येथील विद्यामंदिरमध्ये त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. आजरा महाविद्यालयामधून बी. एस्सी. (स्टॅटेस्टिक) अभ्यासक्रमाची पदवी घेतल्यानंतर लक्ष्मण याने स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. सहायक वनसंरक्षकपदासाठी गेल्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या लेखी परीक्षेत त्याने यश मिळविले. मात्र, मुलाखतीसाठी तो पात्र ठरला नाही. त्यावर पुन्हा जोमाने तयारी सुरू केली. त्याच्या जोरावर या परीक्षेत ४५० पैकी २८२ गुणांसह राज्यात प्रथम क्रमांक पटकविला. मार्चमध्ये त्याने सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेत राज्यात चौथा क्रमांक मिळविला होता. लक्ष्मण हा सध्या कोल्हापुरातील प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये युपीएससीची तयारी करीत आहे. त्याचे वडील लक्ष्मण आणि आई शोभा या शेती करतात. त्याला ए. बी. फौंडेशनचे दीपक अतिग्रे, ज्ञानदेव भोपळे यांचे मार्गदर्शन लाभले.‘युपीएससी’ तील यशाचे ध्येयसहायक वनसंरक्षक परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याचा खूप आनंद होत आहे. या पदावर रूजू होणार आहे. माझ्या यशात कुटुंबाचा मोठा वाटा असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण याने व्यक्त केली. मोठा भाऊ रामचंद्र यांच्या मार्गदर्शनानुसार स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. स्वत: काढलेल्या नोटस्वर भर देत अभ्यास केला. मुलाखतीच्या तयारीसाठी ए. बी. फौंडेशनचे मार्गदर्शन लाभले. सध्या उपजिल्हाधिकारी पदासाठीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. ‘युपीएससी’ परीक्षेत यश मिळविण्याचे ध्येय असल्याचे लक्ष्मण याने सांगितले. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षा