शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
6
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
7
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
8
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
9
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
10
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
11
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
12
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
13
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
14
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
15
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
16
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
17
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
18
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
19
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
20
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप

रस्त्यांची ‘वाट’ आणखी किती?

By admin | Updated: January 29, 2015 00:33 IST

हसन मुश्रीफ यांच्याकडून पाहणी : नगरोत्थान प्रकल्प चार वर्षे रखडल्याची खंत

कोल्हापूर : ‘शहरातील रस्त्यांवरून फिरताना लाज वाटते’ अशी सहा महिन्यांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांनी मंत्रिपदावर असताना जाहीर टोचणी देऊनही १०८ कोटी रुपयांचा नगरोत्थान रस्ते प्रकल्प रखडला. मुश्रीफ यांनी शहरात पुन्हा नव्याने सुरू झालेल्या या रस्त्यांची आज, बुधवारी पाहणी केली. ‘तुमच्या अडचणी अनेक असतात’ अशी टोचणी देत, ‘कोणाला फोन करायचा सांगा, करतो. मात्र, आता तरी प्रकल्प मार्गी लावा’, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी वेळेत रस्ते करून शहरवासीयांना दिलासा देण्याच्या सूचना प्रशासनासह पदाधिकाऱ्यांना दिल्या.कसबा बावडा सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी २७ जुलै २०१४ ला हसन मुश्रीफ यांनी किमान दिवाळीपूर्वी संपूर्ण शहरातील रस्ते चकचकीत करा, असा सल्ला दिला होता. दिवाळी होऊन चार महिने झाले तरी प्रकल्पाचे काम सुरूच आहे, याच रस्ते प्रकल्पाची पाहणी आज पुन्हा मुश्रीफ यांनी पदाधिकाऱ्यांसह केली. यापूर्वीही २६ जुलै २०१३ रोजीही नगरोत्थानचा मुश्रीफ यांनी पंचनामा केला होता. मात्र, आजही प्रकल्प कासवगतीनेच सुरू आहे.कणेरकरनगर, तुळजाभवानी कॉलनी, साळोखेनगर, फुलेवाडी-रिंगरोड, हॉकी स्टेडियम ते कळंबा जेल, जरगनगर, राजारामपुरी आदी परिसरातील रस्त्यांची मुश्रीफ यांनी आज पाहणी केली. त्यातील बहुतांश रस्ते पूर्णत्वाकडे आहेत. राजारामपुरी परिसरातील रस्ता व कामे निर्माण कन्स्ट्रक्शनचे अनिल पाटील यांना येत्या दोन आठवड्यांत पूर्ण करण्याच्या सूचना मुश्रीफ यांनी दिल्या.प्रभागात फिरताना त्या-त्या भागांतील नगरसेवक नगरोत्थनाबाबत व्यथा सांगत होते. गेली चार वर्षे प्रकल्प रखडल्याने त्याचे ‘पाप’ आमच्या माथी मारले जात आहे. नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे, वर्तमानपत्रांतून दररोज उलट-सुलट छापून येत आहे, तुम्ही या अडचणींतून मार्ग काढा, अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर मुश्रीफ यांनी प्रकल्प रखडण्यात अनेक अडचणी आहेत? असे सूचक विधान करत टोचणी घेतली.स्थायी समिती सभापती आदिल फरास, गटनेता राजू लाटकार, नगरसेवक परिक्षित पन्हाळकर, सुनील पाटील, सुभाष भुर्के, माधुरी नकाते, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आर. के. पोवार, कार्यकारी अभियंता एस. के. माने, साहाय्यक अभियंता हर्षदीप घाटगे आदी उपस्थित होते.