शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

वंशाच्या दिव्यात किती नकुशी होरपळणाऱ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 21:38 IST

कोल्हापूर : ‘घराण्याला वंशाचा दिवा हवाच,’ या पुरुषसत्ताक मानसिकतेतून आजही मातेच्या गर्भात स्त्रीभ्रूणाची हत्या होते. कधी-कधी जन्मदाती आईच नवजात मुलीसाठी मृत्यूची शय्या तयार करते, हे विदारक वास्तव आहे. स्त्रीच्या गर्भातून मुलगी जन्माला यावी की मुलगा याला मुख्यत्वे पुरुषच जबाबदार असताना स्त्रीला मात्र कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे मुलीची हत्या करण्याचे पाऊल ...

ठळक मुद्दे मुलगाच पाहिजे मानसिकतेची बळी अजून किती नकोशींचे आयुष्य जाळत जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.पुरुषप्रधान संस्कृती आणि वारसा या समजुतीची मुळे समाजमनात इतक्या खोलवर रुजली आहेत हे पाऊल उचलायला भाग पाडणारी सासरची मंडळी आणि विशेषत: पती ‘मी नाही त्यातला’ म्हणून मुक्तपणे समाजात वावरतो.

कोल्हापूर : ‘घराण्याला वंशाचा दिवा हवाच,’ या पुरुषसत्ताक मानसिकतेतून आजही मातेच्या गर्भात स्त्रीभ्रूणाची हत्या होते. कधी-कधी जन्मदाती आईच नवजात मुलीसाठी मृत्यूची शय्या तयार करते, हे विदारक वास्तव आहे. स्त्रीच्या गर्भातून मुलगी जन्माला यावी की मुलगा याला मुख्यत्वे पुरुषच जबाबदार असताना स्त्रीला मात्र कौटुंबिक आणि सामाजिक दबावामुळे मुलीची हत्या करण्याचे पाऊल उचलावे लागते. दुसरीकडे, अशा गुन्'ाला कारणीभूत असलेले पुरुष मात्र कायद्याच्या कचाट्यातून नामानिराळे राहिले आहेत. या ‘वंशाच्या दिव्या’चा अट्टहास आणखी किती मुलींचे आयुष्य होरपळून टाकणार, हा मुख्य सामाजिक प्रश्न आहे.

स्त्री-समानतेच्या कितीही कथा सांगितल्या जात असल्या तरी मंगळवारी (दि. २९) गडमुडशिंगी येथे मातेने मुलीला जिवंत पुरण्याचा प्रयत्न केल्याची घटना म्हणजे अजूनही पुरुषी सत्तेचे आणि अहंकाराचेच द्योतक आहे. पहिल्या पत्नीला चार मुलीच झाल्याने नवºयाने तिला सोडून दुसरे लग्न केले. दुसºया पत्नीलाही ‘मुलगाच जन्मला पाहिजे,’ अशी तंबी देण्यात आली. मात्र पाचवीही मुलगीच झाली आणि तीही थोडीशी व्यंग असलेली; त्यामुळे मातेने आणि आजीनेच मिळून मंगळवारी नवजात मुलीला खड्ड्यात पुरून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या जीवनाची दोरी बळकट म्हणून ती वाचली. या प्रकरणी आई आणि आजीवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र तिला हे पाऊल उचलायला भाग पाडणारी सासरची मंडळी आणि विशेषत: पती ‘मी नाही त्यातला’ म्हणून मुक्तपणे समाजात वावरतो. स्त्री मात्र पुन्हा समाजाच्या दृष्टीने गुन्हेगार ठरते.तेकडूनच नवजात मुलीचा खून झाला. तिला रस्त्यावर, कचराकुंडीत, कधी मंदिराच्या दारात सोडले जाते. या घटना प्रकाशात आल्या की ‘माता तू न वैरिणी’ अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होतात. महासत्तेच्या दिशेने पाऊल टाकणाºया भारतात मात्र पुरुषप्रधान संस्कृती आणि वारसा या समजुतीची मुळे समाजमनात इतक्या खोलवर रुजली आहेत की, त्या मानसिकतेत खुनासारखा गुन्हा करण्यासाठीही मागे-पुढे पाहिले जात नाही. त्यासाठी महिलेला हतबल केले जाते. मुळातच चार मुली असलेल्या पुरुषाशी लग्न करणे आणि मुलगी झाली म्हणून पती नांदवणार नाही या भीतीपोटी मातेने हे पाऊल उचलणे म्हणजे तिच्यावर किती वाईट पद्धतीने दबाव टाकला गेला असेल याचा विचार व्हायला हवा. आज तिच्यावर आणि आजीवर गुन्हा नोंद झाला; पण पतीने वंशाच्या दिव्याचा हट्ट सोडला नाही. हा दिवा अजून किती नकोशींचे आयुष्य जाळत जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.मुलगा-मुलगी पुरुषावरच अवलंबूनस्त्रीमध्ये एक्स गुणसूत्रे असतात. पुरुषांमध्ये एक्स आणि वाय अशी दोन गुणसूत्रे असतात. स्त्रीबीजाशी पुरुषाच्या एक्स गुणसूत्राचे फलन झाले की मुलगी आणि वाय गुणसूत्राचे फलन झाले की मुलगा जन्मतो. त्यामुळे स्त्रीच्या गर्भातून मुलगा जन्मावा की मुलगी याला पुरुषच सर्वस्वी जबाबदार ठरतो. मा़त्र जोपर्यंत समाजाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घडतच राहणार.- डॉ. सतीश पत्की

नवरा सोडून देईल या भीतीपोटी मातेलाच मुलीला जिवे मारण्यापर्यंतचे पाऊल उचलावे लागते, ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याकडे अजूनही विवेकाने लग्न केले जात नाही. पुरुषी मानसिकतेने स्त्रीच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण केला आहे. अशा प्रकरणांमध्ये आधी पुरुषावर गुन्हा नोंद होऊन त्याला शिक्षा झाली पाहिजे.- तनुजा शिपूरकर (सामाजिक कार्यकर्त्या)

कायद्यानुसार या गुन्'ात स्त्री दोषी दिसत असली तरी तिच्यावर मुलगाच पाहिजे याचा किती दबाव असेल हे गुन्'ातूनच सिद्ध झाले आहे. पुरुषी अहंकाराखाली स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्वच नाकारले गेले आहे. गावातील शेजाºयांनी ही घटना उघडकीस आणून मुलीला वाचविले हेही नसे थोडके; पण हे परिवर्तन समाजातील तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे.- डॉ. शुभदा दिवाण (समुपदेश