शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

किती नेते, कार्यकर्त्यांवर कारवाई करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 01:00 IST

कोल्हापूर : यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे किती नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करायची असा पेच ...

कोल्हापूर : यंदा कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेल्या विचित्र राजकीय परिस्थितीमुळे किती नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करायची असा पेच राजकीय पक्षांसमोर निर्माण झाला आहे. राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांची सरमिसळ झाल्याचा हा परिणाम जाणवत आहे.एकीकडे आमदार सतेज पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात थेट मोहीम उघडली आहे. त्यांना मानणारे कोल्हापूर महापालिकेतील काँगे्रसचे २५ हून अधिक नगरसेवक हे थेट मंडलिक यांच्या प्रचारातच आहेत. त्यातील उपमहापौर भूपाल शेटे यांनी ‘कारवाई झाली तरी बेहत्तर,’ अशी जाहीर भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस सर्व नगरसेवकांवर काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.आजऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव श्ािंपी आणि त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी मंडलिक यांचा तर आजºयातील भाजपमधील काहींनी महाडिक यांचा प्रचार सुरू केल्याची तक्रार दोन्ही पक्षांकडे आली आहे.गडहिंग्लजमध्ये श्रीपतराव शिंदे यांच्या पक्षाने राष्ट्रवादी, काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला असला तरी त्यांचे सर्वच कार्यकर्ते आघाडीसोबत राहतील याची शाश्वती देता येत नसल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादीतील आणखी काही नेते आणि प्रमुख कार्यकर्ते हे मंडलिकांच्या प्रचारात कसे आहेत, याचा पवार यांच्या व्हॉटस् अ‍ॅपवर रोज मेसेज जात आहे. भाजपनेही माजी स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ काढली आहे. ढवळे हे महाडिक यांच्या प्रचारात असल्याचा आरोप आहे. मात्र, हीच परिस्थिती अनेक तालुक्यांमध्ये असून दोन्ही काँग्रेसचे काही कार्यकर्ते मंडलिकांच्या पाठीशी तर भाजप-शिवसेनेतील काहींचा महाडिक यांना छुपा पाठिंबा असे चित्र कोल्हापूर मतदारसंघात दिसून येत आहे. त्यामुळे किती नेते आणि कार्यकर्त्यांवर कारवाई करायची, असा प्रश्न पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. आचारसंहितेच्या गुन्ह्णांचे नंतर काय होते ते कळत नाही, अशीच परिस्थिती या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईबाबत होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रचारादरम्यान वातावरण तयार करण्यासाठी अशाप्रकारचे इशारे दिले जातात; परंतु नंतर पक्षाची गरज म्हणून पुन्हा निलंबन मागे घेतल्याचीही उदाहरणे आहेत.