शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

घरची साथ म्हणूनच तबला वादनाची कास

By admin | Updated: December 29, 2015 00:44 IST

साहेबराव सनदी : ‘यंग तबला नवाज आॅफ इंडिया’ पुरस्काराने सन्मान

संतोष तोडकर -- कोल्हापूर आजोबांकडून मिळालेला शास्त्रीय संगीताचा वारसा, आई-वडिलांचे प्रोत्साहन यामुळे लहानवयातच तबल्याशी मैत्री झाली. त्यातनूच पुढे संगीत क्षेत्र मी करिअर म्हणून निवडले, अशी प्रतिक्रिया तरुण तबलावादक साहेबराव सनदी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.लखनौ, उत्तर प्रदेश येथे पार पडलेल्या राष्ट्रीय स्तरावरील शास्त्रीय संगीत स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या साहेबराव सनदी याला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या हस्ते ‘यंग तबला नवाज आॅफ इंडिया २०१५’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लखनौ येथे स्टेट बॅँक आॅफ इंडिया व संगीत मिलन या संस्थेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. महाराष्ट्रासह एकूण बारा राज्यांतून आलेल्या अठरा स्पर्धकांमधून सनदी याची तबला वादनासाठी अंतिम विजेता म्हणून निवड करण्यात आली. साहेबराव सांगतो, ‘आजोबांना भजनाची आवड होती. ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. घरी संगीताचे वर्ग चालायचे. त्यामुळे घरात निरनिराळी वाद्ये दिसायची. माझे बालपण तानपुरा, हार्मोनियम, तबला या वाद्यांच्या सहवासात गेले. मुले ज्या वयात क्रिकेट खेळत असत, त्यावेळी मी वाद्यांवर वेगवेगळे प्रयोग करण्यात दंग असे. आजोबांचा संगीत साधनेचा वारसा पुढे चालावा, अशी आई-वडिलांची इच्छा असल्याने त्यांनी मला नेहमी प्रोत्साहनच दिले. वयाच्या पाचव्या वर्षांपासून पंडित वामनराव मिरजकर यांच्याकडे तबला वादनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. शालेय जीवनात मुख्याध्यापिका सुमित्रा जाधव यांचे प्रोत्साहन लाभले. वयाच्या सातव्या वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये तबला वाजविण्याची संधी मिळाली. वयाच्या बाराव्या वर्षी ‘सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अ‍ॅँड ट्रेनिंग’ या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला, असे तो सांगतो. साहेबरावने गुणीदास संगीत विद्यालयात २००५ पासून राजप्रसाद धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले. सध्या पुण्यातील तालयोगी आश्रम गुरुकुल येथे पंडित सुरेश तळवलकर यांच्याकडे तो शिक्षण घेत आहे.अनेक ठिकाणी संधीकोल्हापूर महोत्सव, राजर्षी शाहू ग्रंथ महोत्सव, तालयात्रा, कोल्हापूर व सांगली आकाशवाणी, दूरदर्शनवरील ‘वा रे वा’ या कार्यक्रमात मला तबला सादरीकरणाची संधी मिळाली असल्याचे साहेबराव यांनी सांगितले.