शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
2
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान संतापला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
3
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
4
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
5
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
6
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली
7
Operation Sindoor : मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
8
आजचे राशीभविष्य: शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल, कामात अपेक्षित यश मिळेल
9
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
10
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...'
11
भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत'
12
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
13
मॅाक ड्रिल करण्यासाठी राज्य झाले सज्ज, सर्व यंत्रणांना मिळाल्या सतर्कतेच्या सूचना
14
महिलांना आता ‘आदिशक्ती’चे बळ; चोंडीतील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
15
साडेपाच हजार कोटी खर्चून राज्यात मंदिरांचा जीर्णोद्धार; मंत्रिमंडळाचा निर्णय : ६८१ कोटी अहिल्यादेवी स्मृतिस्थळासाठी 
16
आधीच्या ओबीसी आरक्षणानुसार ४ महिन्यांत निवडणुका घ्या; मिनी विधानसभेचा मार्ग मोकळा
17
पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
18
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
19
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
20
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन

रंकाळा टॉवर येथे घर पेटविले

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

मोरस्कर गटाकडून हल्ला : घरासह रिक्षा, मोपेड, आगीच्या भक्ष्यस्थानी

कोल्हापूर : रंकाळा टॉवर परिसरातील कांदेकर आणि मोरस्कर गटातील असलेल्या वर्चस्ववादाचा भडका पुन्हा एकदा उडाला. मोरस्कर गटाने कांदेकर गटाच्याकिशोर भोसले (महाराज) यांचे घर रॉकेलचे बोळे टाकून पेटविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, भोसले कुटुंबीय आरडाओरडा करीत पाठीमागील दरवाजाने बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जमावाने घरासमोर लावलेली रिक्षा व मोपेडदेखील पेटवली. ही घटना काल, शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात तणाव असून, पोलीस बंदोबस्त वाढविला आहे. हल्ल्यातील संशयित रणजित मोरस्करसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. तर रोहिणी मोरस्कर व राहुल मोरस्कर हे अद्याप फरार आहेत. याबाबत माहिती अशी, भोसले आणि मोरस्कर एकाच गल्लीत राहतात. त्यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून वर्चस्व व भेलगाडीच्या व्यवसायातून वाद आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कांदेकर व मोरस्कर गटांत धुमश्चक्री उडाली होती. याप्रकरणी दोन्ही गटांवरही लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत. लता किशोर भोसले यांचा मुलगा राहुल याचा जामीन मंजूर न झाल्याने तो बिंदू चौक कारागृहात आहे. या वादातूनच भोसले यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला झाला. दरम्यान, हल्ल्याची माहिती समजताच पोलीस व जवानांंनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. त्यानंतर संशयित आरोपींवर खुनाचा प्रयत्न, जाळपोळ या कलमांखाली गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे करीत आहेत. दरम्यान, शुक्रवारी मध्यरात्री भोसले यांचे घर, रिक्षा व मोपेड गाडी पेटवून संशयित पळून गेल्यानंतर परिसरातील नागरिक या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. सकाळी या परिसरातील अनेक बंगल्यांचे दरवाजे बंद ठेवून लोक आतमध्ये बसून होते. बाहेर पोलीस बंदोबस्त असल्याने घरातून बाहेर पडण्याचे धाडस कोणी करीत नव्हते. माध्यमाचे प्रतिनिधी व छायाचित्रकार घटनास्थळी गेल्यावर काही नागरिक जमा झाले. यावेळी स्वत:चे घर पेटल्याचे पाहून लता भोसले यांना अश्रू अनावर झाले. भोसले कुटुंबीय स्तब्ध होवून आगीमध्ये कोळसा झालेले आपले प्रापंचिक साहित्य, रिक्षा व मोपेडकडे पाहात होते. त्यांच्या घराच्या हाकेच्या अंतरावरच संशयित आरोपीचा बंगला आहे. त्याच्या दरवाजाला कुलूप होते. (प्रतिनिधी)