शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आंबा घाट बंदमुळे हॉटेल व्यावसायिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : पावसाळ्यात आंबा घाटात भूस्खलन झाल्यामुळे महिनाभरापासून आंबा घाटातील वाहतूक बंद ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मलकापूर : पावसाळ्यात आंबा घाटात भूस्खलन झाल्यामुळे महिनाभरापासून आंबा घाटातील वाहतूक बंद आहे. टू-व्हीलर व चारचाकी हलक्या वाहनांसाठी वाहतूक सुरू आहे. आंबा व कोकण येथील पाऊस व धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक येत असतात. कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर प्रसिद्ध आंबा घाट वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे गणपती सणात पर्यटकांवर अवलंबून असणाऱ्या हॉटेल व्यावसायिक, छोटे-मोठे दुकानदार, गाईड आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. बॅंकांचे हप्ते कसे भरायचे? असा प्रश्न आंब्यातील रिसोर्टधारकांना पडला आहे. हॉटेल, रिसोर्ट बंद असल्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे .

दोन वर्षे कोरोना महामारीमुळे व्यवसाय ठप्प आहे. राज्य शासनाने चालूवर्षी कोरोना नियम शिथिल केल्यामुळे थोड्या फार प्रमाणात हॉटेल व इतर व्यवसाय सुरू होते. अचानक पावसाळ्यात ढगफुटी पाऊस व भूस्खलन झाल्यामुळे आंबा घाटात दोन मीटर डोंगरच रस्त्यावर आला. त्यामुळे कोकणात होणारी वाहतूक बंद झाली. पावसाळ्यात पाऊस, धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक आंबा, विशाळगड, पावनखिंड, केर्ले धबधबा आदी ठिकाणी मोठ्या संख्येने येत असतात. पण यंदा घाट बंद असल्यामुळे शाहूवाडी तालुक्यात पर्यटक फारसे फिरकले नाहीत. याचा फटका हॉटेल, रिसोर्ट, छोट्या-मोठ्या व्यवसायांवर झाला आहे. आंबा गावातील सर्व व्यवसाय पर्यटकांवर अवलंबून आहेत. गणपतीच्या सणावेळीदेखील पर्यटक आले नाहीत. त्यामुळे एक महिना झाला व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे.