शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आशा, गटप्रवर्तकांचा पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:28 IST

कोल्हापूर : आशा, गटप्रवर्तकांना ग्रामपंचायतीकडून मिळणारा एक हजार रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता एप्रिलपासून मिळावा, यासह विविध २२ मागण्यांसंबंधी सकारात्मक विचार ...

कोल्हापूर : आशा, गटप्रवर्तकांना ग्रामपंचायतीकडून मिळणारा एक हजार रुपयांचा प्रोत्साहनपर भत्ता एप्रिलपासून मिळावा, यासह विविध २२ मागण्यांसंबंधी सकारात्मक विचार न केल्यास येत्या दहा दिवसांत जिल्हास्तरावर तीव्र आंदोलन करण्याच्या इशाऱ्याचे निवेदन जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनतर्फे सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना देण्यात आले. या वेळी युनियन पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यासंबंधी अधिकारी साळे यांच्याशी चर्चा केली.

ऐन कोरोनाच्या काळात गेल्या महिन्यात मानधन वाढीसह विविध मागण्यासंबंधी आशा आणि गटप्रवर्तकांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने त्यांच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले. याचे अधिकृत पत्र अजून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे उपलब्ध झालेले नाही. शिवाय यापूर्वीच्या प्रलंबित मागण्याही ‘जैसे थे’च आहेत. यामुळे युनियनतर्फे पुन्हा एकदा निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले.

शहर आणि ग्रामीण भागात ३५०० हून अधिक आशा आणि १४१ गटप्रवर्तक आहेत. यातील अनेक गटप्रवर्तक उच्चशिक्षित आहेत. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, दरमहा दहा हजार रुपये वेतन मिळावे, कोरोनाच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता आशा स्वयंसेविका इतकाचा गटप्रवर्तकांनाही मिळावा, मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्हज, सनकोट मिळावे, संप कळातील मानधन कपात करू नये, कंत्राटी पदावरील गटप्रवर्तकांची नियुक्ती कायमस्वरूपी करावी, शासकीय कामकाजासाठी लॅपटॉप मिळावा, डिसेंबरपासूनचा थकीत कोरोना भत्ता मिळावा, आशा, गटप्रवर्तकांना केंद्र सरकारचे नियमित मानधन मिळावे, सोलापूरच्या धर्तीवर जिल्हा परिषद फंडातून प्रत्येक वर्षी २ हजार रुपये सन्मान निधी मिळावा, प्रलंबित प्रोत्साहन भत्ता मिळावा, यांच्यासह २२ मागण्यांकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले. प्रत्येक मागणीवर चर्चा झाली. चर्चेत जिल्हा परिषद पातळीवरचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले.

या वेळी जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या अध्यक्ष नेत्रदीपा पाटील, जिल्हा सचिव उज्ज्वला पाटील, खजिनदार संगीता पाटील, राधिका घाटगे, अनिता अनुसे, गीता गुरव, शुभांगी चेचर आदी पदाधिकारी उपस्थित होत्या.

फोटो : ०५०७२०२१-कोल- आशा निवेदन

कोल्हापुरातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना सोमवारी जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या शिष्टमंडळातर्फे विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.