शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘एचएमटी’च्या आठवणीचे ठोके कोल्हापूरच्या हृदयात कायम !

By admin | Updated: September 13, 2014 00:38 IST

कंपनी काळाआड : २२ वर्षे शहराशी जोडली होती नाळ

सतीश पाटील / शिरोलीरोज सकाळी सातच्या सुमारास ‘एचएमटी’ डबलडेकर पकडण्यासाठी सुरू असलेली महिलांची धडपड, केवळ महिला कामगारांनीच फुल्ल भरून जाणाऱ्या बसकडे असणाऱ्या प्रवाशांच्या नजरा व शिरोली औद्योगिक वसाहतीच्या ‘एचएमटी’ स्टॉपवर सायंकाळी चारला पुन्हा डबलडेकर पकडण्यासाठी उडणारी झुंबड, हे जादा नव्हे तर १५ वर्षांपूर्वीचे शहरातील चित्र. कोल्हापुरातील सुमारे १२० कुटुंबांची आर्थिक नाडी सांभाळणारी हिंदुस्थान मशीन टुल्स तथा अभिजात समयदर्शिका (एचएमटी) ही घड्याळ बनविणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी सुमारे २२ वर्षे येथे चांगल्या प्रकारे कार्यरत होती. त्यामुळे अनेक कुटुंबांबरोबर कोल्हापूरच्या जीवनाचा एक भागच ही कंपनी बनली होती. महिलांना रोजगार मिळावा म्हणून ज्येष्ठ उद्योजक शिवाजीराव देसाई व तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांच्या प्रयत्नांमुळे १९७८ साली पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या पुढाकाराने शिरोली औद्योगिक वसाहतीत ‘अभिजात समयदर्शिका’ ही ‘एचएमटी’चे घड्याळ तयार करणारी कंपनी सुरू झाली. या कंपनीत बंगलोरहून घड्याळाचे सुटे भाग येत होते. हे सर्व सुटे भाग जोडून येथे घड्याळ तयार होत असे. जवळपास महिन्याला ६० हजार घड्याळे तयार होत होती. विशेष म्हणजे कंपनीत सर्वच१२० कर्मचारी महिला होत्या. या महिलांना कंपनीत जाणे-येणे सोपे व्हावे, यासाठी महापालिकेतर्फे १९८०च्या दरम्यान ‘एचएमटी’ या नावाने खास डबलडेकर बसची सोयही करण्यात आली होती. त्यावेळी महिलांना प्रति महिना एक हजार ते बाराशे रुपये पगार होता. साधारण २००० सालापर्यंत ही कंपनी अतिशय जोरातचालली होती; पण सार्वजनिक क्षेत्रातील ‘एचएमटी’ कंपनीला कालपरत्वे बदल व योग्यप्रकारे मार्केटिंग करता आले नाही. बाजारात अनेक नवीन कंपन्या आल्यामुळे बाजारात मोठी स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे शिरोली येथील युनिटमध्ये तयार होणारी घड्याळे उचलली गेली नाहीत. मागणी कमी झाल्यामुळे २००० साली ही कंपनी बंद पडून अवसायनात गेली. यानंतर तीन ते चार वर्षे कर्मचाऱ्यांनी ही कंपनी चालू करावी, पगार मिळावा, यासाठी आंदोलने केली. महाराष्ट्र शासनाकडे दाद मागितली; पण शासनाने याकडे लक्ष न दिल्याने अखेर कंपनी बंद पडली. कर्मचाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्र विकास मंडळाने पगार, देणी भागविली असली तरी कोल्हापूरच्या उद्योगजगताचे मोठे नुकसान झाले आणि २००३-०४ साली ही कंपनी लिलावात काढली. ज्येष्ठ उद्योगपती बापूसाहेब जाधव यांच्या ‘सरोज ग्रुप’ने ही कंपनी विकत घेतली आहे.