शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कागलमध्ये लोकसभेसह विधानसभेलाही इतिहास घडेल: संजय मंडलिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:35 IST

कागल : आमचे विरोधी उमेदवार धनंजय महाडिक यांना जिल्ह्यातील जनतेची जनभावना काय आहे, हे लक्षात आलेले नाही. म्हणून कै. ...

कागल : आमचे विरोधी उमेदवार धनंजय महाडिक यांना जिल्ह्यातील जनतेची जनभावना काय आहे, हे लक्षात आलेले नाही. म्हणून कै. सदाशिवराव मंडलिकांनी काय काम केले असे ते विचारित आहेत. कागल तालुक्यातील जनता नवा इतिहास घडविण्यासाठी सज्ज झाली आहे. समरजित घाटगे, संजयबाबा आणि आमची ही महायुती लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीतही इतिहास घडविणार आहे, असे प्रतिपादन भाजप-शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी केले.करनूर (ता. कागल) येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच लक्ष्मण भंडारी होते. करनूर, वंदूर, लिंगनूर दुमाला या गावांतील तिन्ही गटांचे प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी प्रा. मंडलिक म्हणाले की, मी दहाला उठतो, सातला गायब होतो, अशी खालच्या पातळीवर टीका करणारे महाडिक पाच वर्षे काय केले हे मात्र बोलत नाहीत. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली आहे. यावेळी पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजित घाटगे म्हणाले, जिल्ह्याचा विकास होण्यासाठी भाजप-सेनेचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. सदाशिवराव मंडलिक यांचा वारसा पुढे नेण्यासाठी संजय मंडलिकांना साथ दिली पाहिजे.यावेळी माजी आमदार संजय घाटगे, शिक्षण सभापती अमरीश घाटगे, संभाजीराव भोकरे, युवा सेनेचे हर्षल सुर्वे, मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, अ‍ॅड. नीता मगदूम, अशोक शिरोळे, विलास चव्हाण यांचीही भाषणे झाली. स्वागत, प्रास्ताविक सचिन घोरपडे यांनी, सूत्रसंचालन तानाजी जाधव यांनी, तर आभार बाळासाहेब पाटील यांनी मानले.