शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक दसरा चौकातच मोर्चा समाप्त व्हावा

By admin | Updated: October 8, 2016 01:24 IST

झाडू, टोपलीसह सहभाग : मोर्चाच्या मागे राहून मंगळवार पेठवासीय स्वच्छता करणार

कोल्हापूर : मोर्चाची सुरुवात विविध ठिकाणांहून होईल. मात्र, ऐतिहासिक दसरा चौकामध्येच या मोर्चाची समाप्ती व्हावी. मोर्चा मार्गावर होणारा कचरा गोळा करण्यासाठी झाडू, टोपलीसह सहभागी होऊ, असा निश्चय मंगळवार पेठवासीयांनी केला. मंगळवार पेठवासीय सकल मराठा समाजबांधवांची मराठा क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजिंक्यदत्त हॉलमध्ये बैठक झाली. यावेळी मोठ्या संख्येने मोर्चासाठी येणारी लोकसंख्या लक्षात घेता मोर्चा मार्गावर अस्वच्छता निर्माण होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन मंगळवार पेठ वासीय मोर्चाच्या मागून जाणार आहेत. त्यात मार्गावर स्वच्छता करून कचरा गोळा केला जाणार आहे. शाहू महाराजांनी देशात प्रथम आरक्षण जाहीर केलेल्या दसरा चौकाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे ताराराणी चौकात मोर्चा एकत्रित किंवा जमण्याचा प्रश्न नाही. ही बाब प्रशासनाने ध्यानात घ्यावी. मंगळवार पेठवासीय शिस्त पाळून सहकुटुंब या मोर्चात सहभागी होतील. मोर्चाचा मार्ग बदलून सरकार संख्याबळ कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. या पोलिस व प्रशासनाच्या भूमिकेस ठराव करून विरोध केला. हा ठराव मराठा क्रांती मूकमोर्चा समितीस सुपूर्द केला जाणार आहे. यावेळी बोलताना प्रणाली पार्टे म्हणाल्या, मोर्चातून शासनाला जरब बसावी अशा संख्येने सहभागी व्हा. मुळातच शाळांमधूनच मुलींना शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा. मोर्चात मंगळवारपेठवासीयांनी सहकुटुंब सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. वृषाली धर्मे म्हणाल्या,आरक्षण हे आम्हाला मिळायलाच हवे. अ‍ॅट्रॉसिटीसारख्या कायद्यात बदल करा. बलात्काऱ्यांना ७५ वर्षांची शिक्षा करा. तर प्रवीण राजिगरे यांनी महाराजांचा मावळा म्हणून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी एस. वाय. सरनाईक, बाळासाहेब निचिते, दीपक थोरात, अर्जुन नलवडे, विजयसिंह पाटील, प्रा. आनंद जरग, नितीन पायमल, रवींद्र पायमल, दीपक जाधव, अशोक पोवार, संभाजी जगदाळे, प्रा. दिलीप निंबाळकर, अमर दळवी, प्रज्ञा यादव, अनिल माळी, शरद पोवार, राजेंद्र नलवडे, अनुराधा घोरपडे, आदी मराठाबांधव सहभागी झाले होते.