शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

शिक्षणासाठी त्याचा अनंत अडचणींचा प्रवास

By admin | Updated: September 20, 2014 00:28 IST

उधमपुरातून जिल्ह्यात : अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनमध्ये दाखल

आयुब मुल्ला-खोची --मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विक्राळ पुरामुळे जम्मू काश्मिरमध्ये हाहाकार माजला होता, अशा परिस्थितीत अ‍ॅडमिशन घेण्यासाठी घराबाहेर पडलेला विद्यार्थी शेकडो किलोमीटर दूर श्रीनगरमध्ये अडकला. घरच्यांचा संपर्क तुटला. अ‍ॅडमिशन तर झाले. पण, घरी परतणार कसे? हा प्रश्न त्याच्यासमोर होता. अखेर गावाची ओढ असतानासुद्धा ‘पढाई के आगे दिल क्या करेगा’ असे म्हणत त्याने आपलं मन घट्ट केलं. अनेक प्रसंगांना सामोरे जात तो कोल्हापूर जिल्ह्यातील अशोकराव माने ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशनमध्ये शिकण्यासाठी दाखल झाला. वीरेंद्रप्रतापसिंग चैनसिंग (चप्पाहारी, ता. चेनहानी, जि. उधमपूर) याला सिव्हिल अभियांत्रिकीसाठी प्रवेश हवा होता. त्यासाठी तो एआयसीटीईच्या कौन्सलिंग राऊंडला श्रीनगरमध्ये आला. माने इन्स्टिट्युटची सर्व माहिती उच्चशिक्षित स्टाफ यांची सविस्तर माहिती त्याने वेबसाईटवर बघितली अन् निवड केली. त्यानुसार त्याचा या राऊंडला प्रवेश निश्चित झाला. विशेष शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रवेश न झाल्याने सात दिवसांच्या आत सदर कॉलेजमध्ये हजर होऊन प्रवेश अंतिम करणे गरजेचे होते. त्यानुसार तो पोहोचला आणि प्रवेश घेतला. परंतु, त्याचा यासाठी झालेला प्रवास हा अनंत अडचणींना पार करणारा ठरला. ज्यावेळी तो कौन्सिलिंग राऊंडला बाहेर पडला त्यावेळी त्याच्याजवळ थोडे पैसे व कागदपत्रे होती. परंतु, पावसाचे थैमान, पूरस्थिती, अशी भयानक परिस्थिती निर्मााण होईल, असा विचार देखील त्याच्यासमोर नव्हता; पण प्रवेश निश्चित झाल्यानंतर मात्र त्याच्यासमोर घरी जायला सुद्धा पर्याय नव्हता. सर्व रस्ते बंद होते, अशा परिस्थितीत शिक्षणासाठी महाराष्ट्रात येणारा हा विद्यार्थी चिंतेत होता. गव्हर्नर कार्यालयाजवळील हेलिपॅडवर बिस्कीट, बटाटा खाऊन तीन दिवस काढले. चौथ्या दिवशी श्रीनगर एअरपोर्टवर पोहोचला. तेथून लष्करी विमानाने जम्मू विमानतळावर आला. त्यानंतर विमानाने तो दिल्ली व तेथून पुणे येथे आला. वाठार तर्फे वडगाव येथील माने इन्स्टिटयुटमध्ये पोहोचला. रीतसर प्रवेश घेतला. संस्थेचे अध्यक्ष विजयसिंह माने, कार्यकारी संचालक डॉ. दीपक मुदगल यांनी त्याचा थक्क करणारा प्रवास ऐकून आपुलकीने मदत केली. दरम्यानच्या काळात त्याचा घरच्यांबरोबर फोनवरून संपर्क झाला. ‘पढाई के लिए मै महाराष्ट्र में पहुँचा हूँ, मै ठिक हूॅँ. अपना खयाल रखना’ असा एवढा भावनिक व आधार देणारे शब्द तो बोलला. आता तो येथील विद्यार्थ्यांमध्ये रमला आहे; परंतु त्याच्या चेहऱ्यावर मात्र, गावच्या परिस्थितीची ओढ दिसून येते.