शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

५४व्या वर्षी तिची यशाला गवसणी

By admin | Updated: June 16, 2015 01:14 IST

जिद्दीची कहानी : यड्राव येथील छाया शिंदे दहावीची परीक्षा उत्तीर्ण

दगडू कांबळे - अब्दुललाट -घरातील सर्वजण उच्च शिक्षित, नोकरदार, सुशिक्षित वातावरण, मग आपणच मागे कसे.. आपण ही आता शिकायचे... शिकण्याच्या दुर्दम्य इच्छेच्या बळावर दहावीच्या परीक्षेत ५० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. या यशाबद्दल या विद्यार्थिनीवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष बाब म्हणजे या विद्यार्थिनीचे वय आहे ५४ वर्षे, वयाच्या ५४ व्या वर्षी छाया शिंदे यांनी दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्ण देखील झाल्या.यश हे नुसतेच मिळत नाही. त्याला साथ हवी असते जिद्दीची, चिकाटीची आणि प्रचंड मेहनतीची. या सर्व गोष्टी ज्यांच्या अंगात आहेत, त्यास तुमच्या ध्येयापासून कोणी थांबवू शकत नाही. असंच काहीतरी यड्राव (ता. शिरोळ) येथे राहणाऱ्या, पण नोकरीसाठी अब्दुललाट येथे कार्यरत असणाऱ्या छाया बाजीराव शिंदे यांच्याबाबत म्हणावे लागेल.छाया शिंदे यांनी छाया काळू पोवार या नावाने दहावीची परीक्षा दिली होती. नाईट कॉलेज इचलकरंजी या शाळेच्या त्या विद्यार्थिनी आहेत. त्यांचा विवाह १९८० साली झाला. शासनाच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या अब्दुललाट येथील प्रशिक्षक अंगणवाडी क्रं. १६६ येथे मदतनीस म्हणून कार्यरत आहेत. विवाहापूर्वी त्यांचे शिक्षण सहावीपर्यंत झाले होते. विवाहानंतर त्यांची शाळा शिकण्याची इच्छा अधुरी राहिली होती. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी २००९ साली नाईट हायस्कूल येथे प्रवेश घेतला. सर्वच इयत्ता पास होत यावर्षीची दहावीची परीक्षाही दिली. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्या पासही झाल्या. पास झाल्याचा आनंद त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गगनात मावेनासा झाला.शाळा, अभ्यास व परीक्षा या अग्निदिव्यातून जाण्यासाठी त्यांचे पती बाजीराव शिंदे यांनी मोलाची साथ दिली. छाया शिंदे यांना पती, दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा सुशिक्षित परिवार आहे. हा सगळा कौटुंबिक व्याप सांभाळून त्यांनी वयाच्या ५४व्या वर्षी मिळविलेले यश इतरांना निश्चितच प्रोत्साहन देणारे आहे. घरात सर्वजण शिक्षितछाया शिंदे यांचे पती भारतीय स्टेट बँकेत कर्मचारी आहेत. तर मोठा मुलगा आदर्श इचलकरंजीच्या एका बँकेत व्यवस्थापक, तर अमोल हा मुलगा दूध संस्थेत कामाला आहे. त्यांच्या सुनादेखील पदवीधर आहेत.अपूर्ण राहिलेल्या शिक्षणाची नेहमी खंत वाटायची. शिक्षण पूर्ण करण्याचे ध्येय होते. पती, मुलांच्या प्रेरणेमुळे दहावीची परीक्षा दिली आणि उत्तीर्णदेखील झाले. पुढेदेखील शिकण्याची इच्छा आहे.- छाया शिंदे