शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

महिला, बालसुधारगृहातील शोषण रोखण्यास ‘हेल्पलाईन’

By admin | Updated: January 1, 2015 00:25 IST

विद्या ठाकूर : नव्या सरकारने महिलांसंदर्भातील उचलले पहिले पाऊल

कोल्हापूर : महिला व बालसुधारगृहातील अत्याचारांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील सुधारगृहांतील शोषण रोखण्यासाठी हिवाळी अधिवेशनात ‘हेल्पलाईन’ सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. लवकरच ही हेल्पलाईन सुरू केली जाईल. नव्या सरकारने महिलांसंदर्भातील हे पहिले पाऊल उचलले आहे, अशी माहिती महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी आज, बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना दिली.ठाकूर म्हणाल्या, भाजप युती सरकार सत्तेवर येऊन दोन महिने होत आहेत. या सरकारने महिलांसाठी विविध संकल्प केले आहेत. महिला व बालसुधारगृहात शोषणासारखे होणारे प्रकार व तेथील इतर तक्रारींसंदर्भात स्वतंत्र योजना करण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे. त्यामध्ये तक्रारींसंदर्भात ‘हेल्पलाईन’ सुरू केली जाणार आहे. या ‘हेल्पलाईन’द्वारे या संदर्भातील तक्रारी समोर येण्यासाठी मदत होईल. कुपोषण प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. स्त्री भ्रूणहत्या हा सामाजिक विषय असून तो सरकारपुरता मर्यादित नाही. त्यासाठी सर्वांनी समाजप्रबोधन करून हा प्रकार रोखला पाहिजे. घरातील मोठ्या पुरुष मंडळींनीही यामध्ये पुढे आले पाहिजे. येणाऱ्या काळात या प्रश्नावर मात करण्यासाठी अधिक परिश्रम करण्याची गरज आहे.यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) शिल्पा पाटील, शहर पुरवठा अधिकारी दिलीप सणगर, भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, शिवाजी बुवा, नाथाजी पाटील, अल्केश कांदळकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांच्या थकलेल्या वेतनासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली आहे. ते लवकरच देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महिलांवरील बलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला पोलिसांचा कक्ष तयार केला जाईल. आरोपीवर तत्काळ कारवाई होईल, यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत.