शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लग्न सोहळ्यातील खर्च टाळून शाळेच्या इमारतीला मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:26 IST

कडगाव/गजानन देसाई : लग्न म्हणजे अवाढव्य खर्च, आलिशान मंडप, हॉलचे बुकिंग, जथे, जेवणावळी, आहेर, पै-पाहुण्यांचा रूसवा-फुगवा, वरातीतील आतषबाजी, डीजेची ...

कडगाव/गजानन देसाई

: लग्न म्हणजे अवाढव्य खर्च, आलिशान मंडप, हॉलचे बुकिंग, जथे, जेवणावळी, आहेर, पै-पाहुण्यांचा रूसवा-फुगवा, वरातीतील आतषबाजी, डीजेची यंत्रणा, मित्र-मंडळींच्या खर्चासाठी हातावर ठेवलेली पाकिटे आणि यातून लागणारी खिशाला कात्री. साध्या लग्नसमारंभासाठी सर्वसामान्य कुटुंबीयांचा एक ते दोन लाख तर श्रीमंतांचा २५ ते ३० लाख असा खर्चाचा अंदाज. एखाद्या लग्न सोहळ्यातील हे नेहमीचे चित्र. कोरोनाच्या दणक्‍याने हा खर्च आटोक्‍यात आलाय, हे मात्र नक्की.

मात्र लग्नातील खर्चाची रक्कम तेवढी, पण ती विधायक कामाला वापरण्याचे काम काही जणच करतात. अशाप्रकारे लग्नातील खर्च टाळून गावातील प्राथमिक शाळेच्या इमारतीसाठी मदत करण्याचे स्तुत्य कार्य कडगाव (ता.भुदरगड) येथील देसाई बंधूंनी केले आहे. परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.

विद्या मंदिर कडगाव ही केंद्रशाळा परिसरातील नावाजलेली शाळा. येथील माळीतले देसाई सरकार यांनी आपली कोट्यवधी रुपयांची जागा शाळेसाठी देऊ करून गावच्या वैभवात भर घातली. अनेक विद्यार्थी या शाळेने घडवले. मुलांना शिष्यवृत्तीमध्ये यश मिळवून दिलं. अलीकडे सुसज्य अशी शाळेची नवीन इमारत उभी झाली. शंभर टक्के बोलक्या भिंती, स्मार्ट वर्ग, डिजिटल वर्ग, ज्ञान रचनावादी शिक्षण, अनेक कृतीयुक्त उपक्रम राबवण्यासाठी व शाळा सुशोभिकरणासाठी मुख्याध्यापक डी.के.सावंत, शाळा व्यवस्थापन समिती व सर्व शिक्षक यांनी शालेय उठावासाठी ग्रामस्थांना आवाहन केले. मेडिकल व्यवसायामध्ये कार्यरत असणारे राहुल देसाई यांनी आपले छोटे बंधू युवराज देसाई यांच्या लग्न समारंभास येणाऱ्या खर्चाला फाटा देत शाळेस मदत करण्याचा निर्णय घेतला. शाळेस ५५, ५५५ रुपयाची भरीव मदत देऊ केली आणि या प्रसंगी अनेक माझी विद्यार्थ्यांना शाळेस मदत करण्याचे आवाहन केले.

यावेळी मुख्याध्यापक डी. के.सावंत, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, अवधूत देसाई, सविता देसाई, नेहा देसाई, प्रकाश देसाई , प्रकाश पाटील, पांडुरंग देसाई, गजानन देसाई, सुरेश जाधव, रॉबिन डिसोझा, सिद्धेश देसाई, सुशांत कासार, अमोल डेळेकर उपस्थित होते.

फोटो : शाळेसाठी मदतीचा धनादेश मुख्याध्यापक डी. के.सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र देसाई यांच्याकडे देताना नवदाम्पत्य चि. युवराज व चि. सौ. का.कोमल,पांडुरंग देसाई,राहुल देसाई व अन्य.