शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूरच्या दिव्यांग युवकाची कोविड रुग्णांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:23 IST

जयसिंगपूर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत होरपळणाऱ्या व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी जयसिंगपूर येथील दिव्यांग तरुणाने मदतीचा ...

जयसिंगपूर : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत होरपळणाऱ्या व कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी जयसिंगपूर येथील दिव्यांग तरुणाने मदतीचा हात दिला आहे. समाजाचे आपण काही देणे लागतो या विचाराने आपल्या स्वमेहनतीच्या पैशांतून दुग्धजन्य पदार्थांचे वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा प्रयत्न केला.

शाहूनगर येथील २३ वर्षीय दिव्यांग युवक प्रणव पवार याचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे केंद्र आहे. त्याची आजी राजश्री विठ्ठलराव पवार यांचे गतवर्षी ऑगस्ट महिन्यात कोरोनाने निधन झाले होते. सध्या लॉकडाऊनमुळे हा व्यवसाय संथगतीने सुरू असला तरीही आपल्या आजीवरील प्रेमापोटी व त्यांचे स्मरण म्हणून प्रणव व त्याचे मित्र धनंजय साळुंखे, निशांत पवार या युवकांनी उदगांव येथील कुंजवन कोविड सेंटरमधील रुग्णांसाठी ताक, दही अशा दुग्धजन्य पदार्थांचे वितरण केले. या सेंटरमधील अनिल चिलाई, ओंकार शिंदे यांनी रुग्ण व सेंटरच्या वतीने हे पदार्थ स्वीकारले. प्रणव व त्याच्या मित्रांना या समाजसेवेसाठी त्याची आई करूणा पवार यांनी प्रोत्साहन दिले. या उपक्रमामुळे कोविड रुग्णांतून समाधान व्यक्त होत आहे.