शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिनी गरजूंना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत या संकल्पनेनुसार हितचिंतक, कार्यकर्त्यांनी विविध माध्यमांतून ...

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत या संकल्पनेनुसार हितचिंतक, कार्यकर्त्यांनी विविध माध्यमांतून गरजू लोकांना सोमवारी मदत केली. गरजूंना धान्य, जीवनावश्यक वस्तू, सॅनिटायझर, औषधे, फूड पॅकेट व दूध वाटप, फळे वाटप आदी उपक्रम राबविण्यात आले. ऋतुराज पाटील फाउंडेशनच्या वतीने कोल्हापूर शहर, दक्षिण मतदारसंघातील कोविड सेंटरमधील रुग्ण आणि फ्रंटलाईन वर्कर, वृद्धाश्रम, बालकल्याण संकुलला सहा हजार वाफेचे मशिन्स देण्यात येणार आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते फ्रंटलाईन वर्कर्सना प्राथमिक स्वरूपात वाफेची मशीन देण्यात आली.

आमदार ऋतुराज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त गरजूंना मदत ही संकल्पना घेऊन गरजू लोकांना कोणत्याही स्वरूपात शक्य असेल, त्याप्रमाणे मदत करावी, असे आवाहन केले होते. या आवाहनाला हितचिंतक, कार्यकर्ते, मित्रमंडळी यांनी चांगला प्रतिसाद दिला. अजिंक्यतारा येथे वाफेच्या मशीनचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. डी. वाय. पाटील कुटुंबीयांनी नेहमीच सामाजिक बांधिलकी जपून समाजातील गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त राबविलेला हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे. कोरोनाच्या काळात युवा पिढीने समाजासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. या वेळी आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते. दरम्यान, आमदार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करवीर पंचायत समिती सदस्य सागर पाटील यांनी केआयटी कोविड सेंटरमध्ये ५० हजार रुपयांची औषधे दिली. माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी आयसोलेशन हॉस्पिटलला लसीकरणासाठीच्या एक हजार सिरींज दिल्या. शहर युवक काँग्रेसने पंचगंगा स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांना वाफेची मशीन दिली. कदमवाडीतील विक्रमसिंह घाटगे आणि मित्र परिवाराने कनाननगरमधील वारांगनांना धान्य वाटप केले. महालक्ष्मी फाउंडेशनने उचगाव कोविड सेंटरला १०० किलो धान्य दिले. विक्रमनगरमधील सचिन शेंडे परिवाराने सीपीआरमधील रुग्णांच्या नातेवाइकांना फूड पॅकेट्स, मास्क, सॅनिटायझरचे वाटप केले. काँग्रेस कामगार संघर्ष युनियनचे महाराष्ट्र प्रदेश सचिव योगेश हातलगे यांनी टाकाळा प्रभागातील गरजूंना मोफत धान्य वाटप, प्रभागातील जनावरांना चारा दिला.

चौकट

सॅॅनिटायझर, मास्क वाटप, वृक्षारोपण

राजारामपुरीतील राजदीप भोसले आणि आर. बी. मेंबर्स यांच्यावतीने महापालिका कर्मचार्‍यांना १५०० सॅनिटायझर, १०० सोडियम हायड्रोक्लोराइड आणि ७०० एन ९५ मास्कचे वाटप केले. राधानगरी तालुक्यातील टीम सतेज कार्यकर्त्यांनी राधानगरी कोविड केंद्राला वस्तुरूपात मदत केली. जिल्हा एनएसयूआयकडून सोमवार ते दि. ५ जूनपर्यंत रोज पाचशे जणांना अन्नदान केले जाणार आहे. सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांनी कणेरकरनगर भागात दोन हजार सॅनिटायझर बॉटल्सचे वाटप केले. माजी नगरसेवक राजेंद्र साबळे यांनी स्वातंत्र सैनिक कॉलनीत वृक्षारोपण केले. इचलकरंजीतील आदित्य पाटील यांनी कुरुंदवाड पोलीस ठाणे आणि जानकी वृद्धाश्रमात मास्क, धान्य वाटप केले. पाचगाव ग्रामपंचायतीने आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केले. श्रीमंत जिजाऊ फाउंडेशनच्या साक्षी पन्हाळकर यांनी रुग्णांना दूध वाटप केले.

फोटो (३१०५२०२१-कोल-आमदार ऋतुराज पाटील वाढदिवस) : कोल्हापुरात सोमवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्कर्सना वाफेची मशीन वाटप आमदार चंद्रकांत जाधव आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ऋतुराज पाटील फाउंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.

===Photopath===

310521\31kol_2_31052021_5.jpg

===Caption===

फोटो (३१०५२०२१-कोल-आमदार ऋतुराज पाटील वाढदिवस) : कोल्हापुरात रविवारी आमदार ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त फ्रंटलाईन वर्करना वाफेची मशीन वाटप आमदार चंद्रकांत पाटील आणि पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ऋतुराज पाटील फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.