शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

‘टीडीएफ’ विचारधारेच्या जोरावरच मैदानात

By admin | Updated: May 27, 2014 00:49 IST

दशरथ सगरे : शिक्षक मतदारसंघ निवडणूक

 कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) या विचारधारेच्या जोरावरच निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून, ३० जूनला पुण्यातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे प्रा. दशरथ सगरे यांनी आज, सोमवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. प्रचार दौर्‍यानिमित्त ते कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रा. सगरे म्हणाले, गेल्या निवडणुकीत माझा निसटता पराभव झाला. यामुळे खचून न जाता या मतदारसंघातील शिक्षकांच्या प्रश्नांचा पाठपुरावा केला. त्यामुळे शिक्षकांच्या बळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सातारा येथे यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांसाठी स्वतंत्र संदर्भ अभ्यास ग्रंथालय, शिक्षकांच्या मुला-मुलींसाठी जिल्हा वसतिगृहे, विविध विषयांचे शिक्षक भवन, दरवर्षी शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन, शिक्षकांसाठी तालुकास्तर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, असा वचननामा घेऊन शिक्षक मतदारांसमोर जात आहे. ‘टीडीएफ’चे अधिकृत उमेदवार कोण? याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, गजेंद्र ऐनापुरे यांनी ‘टीडीएफ’ची नोंदणी केली आहे. जयवंत ठाकरे यांची ‘टीडीएफ’ वेगळी आहे. या आघाडीच्या संस्थापकांपैकी दत्ता भोसले वगळता अन्य कोणी अस्तित्वात नाही. त्यांचे मला पाठबळ आहे. त्यामुळे मी अधिकृत उमेदवार आहे. ‘टीडीएफ’ एक विचारधारा असून, तिच्या जोरावरच मी निवडणूक लढवित आहे. तसेच विवेकानंद शिक्षण संस्थेनेही पाठीशी राहण्याची ग्वाही दिली आहे. या पत्रकार परिषदेस आर. डी. महापुरे, अनिल बोधे, राजेंद्र रानमाळे, एम. एस. मोहिते, एम. डी. चव्हाण, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)