शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

परिचारक यांना आजी-माजी सैनिक देतील ते प्रायश्चित्त घ्यावेच लागेल

By admin | Updated: February 20, 2017 23:46 IST

उदयनराजे भोसले ; सैनिकांविषयीच्या बेताल वक्तव्याचा निषेध

सातारा : ‘देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या जवानांविषयी प्रशांत परिचारक यांनी अश्लील विधान करून, सैनिकांविषयी त्यांची असलेली विकृत मनोवृत्ती दाखवून दिली आहे. देशासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून लढणाऱ्या सैनिकांविषयी त्यांची अशी मानसिकता असेल तर त्यांनी आमदार म्हणून सोडाच; पण माणूस म्हणूनही जगण्याचा अधिकार गमावला आहे. त्यांना आता महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील आजी-माजी सैनिक देतील ते प्रायश्चित्त घ्यावेच लागेल,’ अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘देशाच्या रक्षणार्थ असलेल्या सैनिकांप्रती नितांत आदर तमाम देशवासीयांच्या मनामध्ये आहे आणि तो असला पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. ‘जय जवान आणि जय किसान’ हा नारा या देशात दिला गेला. आजी-माजी सैनिकांची गौरवशाली परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. त्याच महाराष्ट्रातील सोलापूरच्या भूमीतएक करंटा आमदार सैनिकांविषयी उदाहरण देऊन, तमाम सैनिकांची मानहानी करतो, हे निश्चितच कोणत्या दिशेने राजकारणी मंडळी चालली आहे हे दिसून येत आहे. कुठे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि कुठे प्रशांत परिचारक. धनशक्तीवर एमएलसीत गेले. हा देश जरुर राजकारण्यांमुळे चालतो. तथापि, त्याही पेक्षा निधड्या छातीच्या सैनिकांमुळे चालतो याचे तारतम्य त्यांनी बोलताना बाळगले पाहिजे होते. त्यांनी आजी सैनिकांचा अपमान केला आहेच त्याही पेक्षा आजी-माजी सैनिकांच्या कुटुंबीयांचा, सामान्य जनतेचाही घोर अपमान केला आहे. त्यांना आता एमएलसी ऐवजी एमएलआयच्या कोल्हापूर किंवा बेळगावच्या मुख्यालयात सोडले पाहिजे म्हणजे ते बाहेर येईलच असे नाही आणि आलेच तर त्यांच्या कुटुंबीयांना ओळखणार देखील नाही.आजी-माजी सैनिक सांगतील ते प्रायश्चित्त त्यांनी आपणहून घ्यावे अन्यथा त्यांना योग्य ते प्रायश्चित्त घ्यायला भाग पाडू,’ असा इशाराही खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)