शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

हॅट्ट्रिकवर विश्वास...अविश्वास! : हातकणंगलेच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 23:47 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक कार्यकर्ता

ठळक मुद्देशेट्टी, माने समर्थकांत पैजा

गणपती कोळी ।कुरुंदवाड : लोकसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे कार्यकर्ते व मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, प्रत्येक कार्यकर्ता आपलाच उमेदवार कसा निवडून येतो, याची आकडेमोड पटवून देत आहेत.

खासदार शेट्टीसमर्थक खासदार हॅट्ट्रिक करणार यावर ठाम आहेत तर विरोधक या मतदारसंघात स्व. बाळासाहेब माने यांच्यानंतर कोणत्याही खासदाराची हॅट्ट्रिक झालेली नाही. त्यामुळे शेट्टी पराभूत होऊ शकतात, यावर विश्वास आहे. त्यातूनच कार्यकर्त्यांतून पैजा लागल्या असून, शेट्टी हॅट्ट्रिक करतात की, विरोधकांचा विश्वास खरा ठरतो, याचा फैसला निकालानंतरच लागणार आहे. मात्र, इर्ष्येच्या राजकारणाच्या चर्चेने रंगत आली आहे.

शेट्टी हे चळवळीतील व शेतकऱ्यांच्या मनातील विश्वासू नेतृत्व असल्याने प्रारंभी ही निवडणूक एकतर्फी वाटत होती. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माने यांच्या विजयाची घेतलेली जबाबदारी व केलेली खेळी, मतदारसंघात शिवसेना-भाजप आमदारांचे असलेले संख्याबळ, ‘एक मराठा-लाख मराठा’ची हाक, वंचित आघाडीच्या मत विभागणीचा फटका यामुळे शेवटच्या टप्प्यात ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामुळे कार्यकर्तेच नव्हे, तर उमेदवारही स्वत:च्या विजयाबाबत साशंक आहेत.

कट्टर कार्यकर्ते मात्र आपलाच उमेदवार निवडून देण्यावर ठाम असून, जेवणापासून ते रोख रकमेपर्यंत पैजा खेळल्या जात आहेत. माने समर्थक या मतदारसंघात बाळासाहेब माने यांचा अपवादवगळता अन्य कोणत्याही खासदारांनी हॅट्ट्रिक केलेली नाही. त्यामुळे शेट्टींचा पराभव निश्चित आहे, असा दावा करत आहेत शिवाय मतदारसंघात शिवसेना-भाजप आमदारांची संख्या मोठी असल्याने त्यांचे वर्चस्व आहे. तरुण मतदारांवर मोदी लाटेचा प्रभाव, एकवटलेला मराठा समाज, वंचित आघाडीची विभागलेली मते यामुळे धैर्यशील मानेच निवडून येणार यावर कार्यकर्ते ठाम आहेत.

तर खासदारसमर्थक वंचित आघाडीकडे जाणारी मते खा. शेट्टी यांना फारशी कधीच मिळालेली नाहीत, उलट काँग्रेस समर्थनामुळे मुस्लिम गठ्ठा मतांचा फायदा, शेतकरी चळवळ म्हणून शेतकºयांची मते, सूज्ञ मतदारांतून मोदीविषयी असलेली संतापाची लाट, मतदारसंघात शिवसेना-भाजपचे आमदार असले, तरी लोकसभेत मतदार न ऐकण्याची भूमिका यामुळे निवडून येण्यास अडचण नाही. गतवेळचे फार तर लीड कमी होईल, मात्र, खा. शेट्टीच निवडून येणार, यावरच त्यांचा विश्वास आहे. एकूणच दावे-प्रतिदावे अन् आकडेमोडीवरून कार्यकर्त्यांतून रंगलेली चर्चा मतदार व कार्यकर्त्यांत निकालाच्या उत्सुकतेत भर पडत आहे.शेट्टींनी बनविले नरेंद्र मोदींना टीकेचे लक्ष्यहातकणंगले लोकसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. शेतकºयांचा ऊस व दूध दरावरून रणांगण गाजविलेले

खा. राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर ‘स्वाभिमानी’कडून निवडणुकीत उतरले आहेत. शेट्टी यांनी भाजपला विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टीकेचे लक्ष्य केल्याने भाजप-शिवसेना युतीने शिवसेनेकडून धैर्यशील माने यांना उमेदवारी देऊन राजकीय खेळी खेळली आहे.

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९