शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिनी उद्या शरद पवार यांना ऑनलाईन शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी हाेत असलेल्या शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विशेष खबरदारी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी हाेत असलेल्या शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त विशेष खबरदारी म्हणून एकच कार्यक्रम होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण राज्यभरात ११ ते २ या एकाच वेळी होणार आहे. कोल्हापुरात मार्केट यार्डातील शाहू सांस्कृतिक सभागृहात हजारावर नेते, कार्यकर्ते ऑनलाईन पद्धतीने पवार यांना शुभेच्छा देऊन ५५ वर्षांच्या राजकीय, सामाजिक प्रवासाच्या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार होणार आहेत.

मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा सोहळा होणार आहे. यावेळी पवार यांच्या राजकीय, सामाजिक प्रवासाची चित्रफीत दाखवली जाणार आहे. कोल्हापुरात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण सोहळा होणार आहे. शाहू सभागृहात एक हजारजणांच्या बसण्याची सोय केली आहे, तर मोठे स्क्रीन लावले जाणार आहेत. या सोहळ्यात शरद पवार स्वत: निवडक कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संवाद साधणार आहेत.

कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील कार्यकर्ते थेट पवार यांच्याशी बोलणार आहेत. सर्वांत आधी मान कोल्हापूर जिल्ह्याचा असणार आहे. या सोहळ्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांसह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, शहर सरचिटणीस सुनील देसाई यांनी दिली.