शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
4
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
5
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
6
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
7
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
8
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
9
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
10
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
11
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
14
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
15
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
16
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
17
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
18
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
19
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
20
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

अर्ध्यावरती डाव मोडला...अधुरी एक...

By admin | Updated: December 27, 2014 00:33 IST

फराकटेवाडी येथील घटना : पत्नीच्या ओटीभरणी कार्यक्रमाच्या धावपळीतच जवानाचा मृत्यू

बोरवडे : माणसाच्या जीवनाची वाटचाल नियत ठरवत असते. नियतीच्या नियमापुढे कोणाचेही चालत नाही. त्यांच्या लग्नाला अवघी दीड वर्षे झालेली. पत्नीच्या ओटीभरणी कार्यक्रमासाठी म्हणून तो घरी आला. घरातच हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. आणि त्याचा दीड वर्षाचा संसार संपला. अर्ध्यावरती डाव मोडला.... अशीच कहाणी त्याच्या जीवनाची झाली. फराकटेवाडी (ता. कागल) येथील अनिल जोती पाटील हा युवक घरच्या गरिबीवर मात करून २००५ मध्ये पुणे येथे सीआरपीएफ (जीवन बटालियन) मध्ये भरती झाले. आयुष्याच्या जोडीदाराची स्वप्ने रंगवत असतानाच दीड वर्षापूर्वी ते लग्नाच्या बेडीत अडकले. पत्नी सहा महिन्यांची गर्भवती आहे. दोन दिवसांपूर्वी पत्नीच्या ओटीभरणी कार्यक्रमासाठी पुणे येथून दहा दिवसांच्या सुटीवर ते आले. कार्यक्रम संपन्न वातावरणात पार पाडायचा या तयारीत असतानाच काल, गुरुवारी दुपारी त्यांच्या छातीत दुखायला लागले. धावपळीच्या त्रासाने असेल म्हणून त्याकडे थोडं दुर्लक्ष झाले. गुरुवारी सायंकाळी जोरदार झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. पत्नी सात महिन्यांची गरोदर असताना जीवनाचा रथ हाकण्याची साथ घेतलेल्या या दाम्पत्याला अखेर नियतीपुढे झुकावे लागले. आले देवाच्या मना तेथे .... या म्हणी प्रत्यक्ष अनुभव फराकटेवाडी ग्रामस्थांना पहायला मिळाला. घडलेल्या या प्रसंगाने सारेच ग्रामस्थ अस्वस्थ झाले. जीवनाची अखंड साथ देण्याचे वचन दिलेल्या त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी घरी गर्दी झाली होती. पाटील यांच्या पश्चात वडील, भाऊ असा परिवार आहे.