शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशाची महिलारुपी अर्धी शक्ती घरातच

By admin | Updated: March 11, 2017 23:47 IST

चंद्रकांतदादा पाटील : ताराराणी महोत्सवास ‘खराडे कॉलेज कॅम्पस’मध्ये प्रारंभ

कोल्हापूर : महिलांच्या रूपाने देशाची पन्नास टक्के शक्ती घरातच अडकून पडली आहे. या शक्तीला प्रेरणा व प्रोत्साहन देऊन, सक्रिय करून गतिमान करण्यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. उत्पादित मालाची गुणवत्ता ठिकवण्यासाठी बचत गटांना मार्केटिंगबरोबर प्रशिक्षणाची गरज आहे. त्याशिवाय बचत गट स्पर्धेत टिकू शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व जिल्हा परिषदेच्या वतीने खराडे कॉलेज कॅम्पस, शिवाजी पेठ येथे आयोजित केलेल्या ‘ताराराणी महोत्सवा’स शनिवारी प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील होत्या. बचत गटांच्या उत्पादित मालाची विक्री होईलच; पण त्याची स्तुती होण्यासाठी प्रयत्न करावेत. देशातील प्रत्येक माणसाने कष्ट करून जगले पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. अनुदान, कर्ज, कर्जमाफी या गोष्टींचा विचार त्या- त्यावेळी घेतला जातो; पण एखादी व्यक्ती मोकळी राहिली की, तिच्यात विकृती तयार होते. त्यातूनच तरुण-तरुणींमध्ये टिंगलखोरी वाढत जाते. यासाठी आपल्या जीवनातील जास्तीत जास्त वेळ पैसे कमविण्यासाठी खर्च केला पाहिजे. बचत गटांना सक्षम करण्यासाठी तालुकास्तरावर विक्री केंद्रे सुरू करण्याबरोबरच बिनव्याजी व विनाभाड्याने विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटले. बचत गटांनी आपल्या उत्पादित मालाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन करीत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भागीरथी महिला मंडळातर्फे बचत गटांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ मिळावी, यासाठी आॅनलाईन शॉपिंगची सोय करून दिली आहे. जिल्हा विक्री केंद्रे बंद पडली असून, ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करीत अध्यक्ष विमल पाटील म्हणाल्या, ताराराणी महोत्सव हा महिलांना हक्काचे व्यासपीठ आहे, त्याचा लाभ घ्यावा. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी स्वागत केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी आभार मानले. यावेळी महापौर हसिना फरास, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, माजी महापौर सई खराडे, अभिजित तायशेटे, सीमा पाटील, अश्विनी धोत्रे, अर्चना खाडे, प्रकल्प संचालक डॉ. एच. ई. जगताप, युनियन बॅँकेच्या जिल्हा समन्वयक तृप्ती गायकी, लीड बॅँकेचे व्यवस्थापक एस. जी. किणिंगे, आदी उपस्थित होते. सरकार चालविताना हैराण! गेल्या अडीच वर्षांत राज्यातील विविध विभागांतील अधिकाऱ्यांचे कामकाज जवळून पाहिले आहे. सरकार चालविताना आपण हैराण झाल्याची उद्विग्न भावना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. ‘ताराराणी महोत्सवा’त पहिल्या दिवशी दीड लाखाची उलाढाल झाली. महोत्सवात १५८ स्टॉल असून, त्यामध्ये ३९ खाद्यांचे, तर ११९ बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे स्टॉल उभारण्यात आले आहेत. बुधवार (दि. १५) पर्यंत महोत्सव चालणार आहे. ३६ बचत गटांचा गौरव!जिल्ह्णातील ३६ बचत गटांचा ‘राजमाता जिजाऊ स्वावलंबन’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील तीन बचतगटांना मंत्री पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मोबाईल अ‍ॅपचे उद्घाटनग्रामीण भागातील जनतेला सहजपणे जिल्हा परिषदेची माहिती व सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मोबाईल अ‍ॅप तयार केले आहे. त्याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले.